हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसचे दुसरे पर्व सुरु आहे. देवमाणूस २ चालू झाल्यानंतर सुरुवातील या मालिकेने अपयश पचवले पण पुढे पुढे मालिकेचा टीआरपी खतरनाक वाढला. त्यामुळे या मालिकेच्या दुसऱ्या सिजननेही पहिल्या सिजनइतकी लोकप्रियता नक्कीच मिळवली आहे. सध्या मालिकेत विविध ट्विस्ट आणि टर्न येत आहेत.
मालिकेत नव्याने एंट्री झालेल्या इन्स्पेक्टर जामकरच्या भूमिकेने तर प्रेक्षकांना वेड लावलाय. त्यामुळे मालिकेला वेगळाच मसाला मिळाला आहे. यातच आता मालिकेशी निगडित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती अशी कि, ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तूर्तास अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र अशी चर्चा सुरु आहे.
सध्या मालिकेत सुरू असलेल्या कथानकानुसार हि मालिका लवकरच संपणार आहे अशा चर्चा आहेत. इतकाच नाही तर हा या मालिकेचा शेवट नसून तिसरा भाग येणार आहे असेही म्हटले जात आहे. मालिकेच्या पहिल्या सिजनपासूनच डॉक्टर अजित अर्थात अभिनेता किरण गायकवाड लोकांच्या मनावर राज्य करतोय. यात पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात नटवर सिंगच्या भूमिकेत तो दिसला. डॉक्टर अजितचा डाव संपवण्यासाठी त्याच्यापेक्षाही तरबेज आणि हुशार असणारा व्यक्ती हवा होता आणि त्याची अखेर एंट्री झाली. या मालिकेत मार्तड जामकर या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे साकारत असून ते डॉक्टर वर भारी पडताना दिसत आहेत.
मार्तंड जामकरमूळे मालिकेचा टीआरपी सर्र्कन वाढला. आता कथानकाने वेग पकडला आहे. दरम्यान, मालिका आता महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आहे. डॉक्टर जामकरच्या जाळ्यात अडकणार का? की यावेळीही तो यातून बाहेर पडणार..? या प्रश्नांचे उत्तर म्हणजे मालिकेचा शेवट किंवा नव्या पर्वाची सुरुवात. माहितीनुसार, हि मालिका संपणार असल्याचं आणखी एक कारण दिलं जातंय ते नव्या मालिकेचे आगमन. ‘आप्पी आमची कलेक्टर’ नामक मालिकेचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे.त्यामुळे देवमाणूस संपून हि मालिका सुरु होणार असं बोललं जात आहे. पण अजूनही अशी कोणतीच अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे तूर्तास हि मालिका संपणार का..? असा प्रश्न कायम आहे.
	
					
		
		
		
    
    
    
			
                                    
            
Discussion about this post