Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सौरभ- अनामिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘तू तेव्हा तशी’ मालिका शेवटच्या वळणावर..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 4, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tu Tevha Tashi
0
SHARES
445
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू तेव्हा तशी’ हि सौरभ आणि अनामिका यांच्या जोडीने गाजवली. सौरभ पटवर्धन आणि अनामिका दीक्षित यांच्या चाळिशीतल्या प्रेमाची हि गोष्ट प्रेक्षकांना आधी खटकली पण पुढे प्रेक्षक या मालिकेच्या कधी प्रेमात पडले तेच कळलं नाही. मालिकेतील दमदार ट्विस्टने प्रेक्षकांचं मन शेवटी जिंकलंच. या मालिकेने नुकतेच तब्बल ३०० भाग पूर्ण केले आहेत. प्रचंड ट्रोलिंगनंतरही या मालिकेने हे यश गाठले आहे. आता कुठे या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनात शिरले आहेत आणि असे असताना जी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असे समजत आहे,

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकायला वेळ घेतला पण आता हि मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतून मराठी अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी बऱ्याच काळानंतर मालिकाविश्वात कमबॅक केलेलं. त्यांची सौरभ आणि अनामिका ही जोडी लोकप्रिय ठरली. वयाच्या चाळीशीत प्रेमासाठी थांबलेला सौरभ आणि पुन्हा प्रेमात पडलेली अनामिका सगळ्यांनाच प्रिय वाटू लागली. यामुळे हि रील लाईफ जोडी आणि ‘तू तेव्हा तशी’ मालिका प्रेक्षकांच्या प्रेमास पात्र ठरली. सध्या हि मालिका रंजक वळणावर आहे. मालिकेतील वल्ली सतत अनामिका आणि सौरभला वेगळं करण्यासाठी कारस्थान रचते. ज्यामुळे पुन्हा एकदा सौरभ आणि अनामिकाला प्रेमाच्या कसोटीवर खरं उतरावं लागणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यांनी आता एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून मालिकेत पुढे काय घडणार..? आता हे दोघे एकत्र कधीच येणार नाहीत का..? कि एकत्र येतील ते कायमचे..? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. पण यापैकी एका प्रश्नाचं उत्तरचं या मालिकेच्या सांगतेकडे नेणार आहे. तरीही अद्याप मालिका संपण्याविषयी निर्मात्यांनी कोणीतीही वाच्यता केलेली नाही. त्यामुळे पुढे काय होणार..? याबाबत अधिक चर्चा सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मात्र ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित व्हायची. तिची जागा लवकरच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही नवी मालिका घेणार आहे. ज्यामध्ये शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यामुळे ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेला प्रेक्षकांना निरोप द्यावाच लागेल असे वाटत आहे.

Tags: Instagram PostShilpa Tulaskarswapnil joshiTu Tevha TashiViral VideoZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group