Take a fresh look at your lifestyle.

‘त्यावेळी मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’- प्रियांका चोप्रा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड मध्ये असलेल्या घराणेशाहीचा वाद बाहेर आला. बॉलिवूड मधील अनेक दिग्ग्ज कलाकारांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना यावेळी सांगितल्या. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादावर एक वक्तव्य केले होते. तिलाही एका चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचे तिने यावेळी म्हटले.

प्रियांकाने मिड-डे ला नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या सोबत घडलेला हा किस्सा सांगितला. सध्या घराणेशाहीचा वाद सुरु असल्यामुळे तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘चित्रपटसृष्टीचा वारसा असलेल्या कुटुंबात जन्माला येणे यात काहीच गैर नाही. स्टार किड्सवर देखील एक वेगळ्या प्रकारचा दबाव असतो. मलाही माझ्या वेळी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते’ असे प्रियांकाने म्हटले.

‘मलाही एका चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. कारण निर्मात्यांना माझ्या त्या भूमिकेसाठी दुसऱ्या एका व्यक्तीचे नाव सुचावण्यात आले होते. मला त्या वेळी खूप वाईट वाटले होते पण मी त्यावर फारसा विचार न करता पुढे गेले. त्यानंतर मी स्वत:ला समजावले की कधीही अपयश आले तरी आपण घाबरायचे नाही’ असे प्रियांकाने पुढे म्हटले होते.

प्रियांका सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही तिचा दबदबा पाहायला मिळतो आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच तिचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान खान, झायरा वसीम आणि रोहित शराफ यांनी भूमिका साकारल्या होत्या.