Take a fresh look at your lifestyle.

प्रियांका चोप्राच्या बहिणेला जूनियर NTR च्या फॅन्सकडून रेपची धमकी; म्हणाले तू तर पॉर्नस्टार

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण असलेल्या मीरा चोप्राने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतही मोठे नाव कमावले आहे. ती बर्‍याचदा कोणत्या ना कोणत्या गोष्टींबद्दल चर्चेत असते. पण आता ज्या बातमीमुळे ती चर्चेत आली आहे ती धक्कादायक आहे. मीरा चोप्राला ट्विटरवर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तिने यासंदर्भात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. मीरा चोप्राचे ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत एक प्रश्नोत्तराचे सेशन होते. यादरम्यान एका चाहत्याने मीराला ज्युनियर एनटीआर बद्दल प्रश्न विचारला, मीराने उत्तरात सांगितले कि,’मला ज्युनिअर एनटीआर माहित नाही,ती त्याची फॅन नाही.’

यावरून जूनियर एनटीआरच्या चाहत्यांनी तिला शिव्या देण्यास सुरुवात केली, मीराला पॉर्न स्टार म्हणून हिणवले
मीरा चोप्राच्या या बोलण्यावर जूनियर एनटीआरच्या चाहत्यांचा राग आला आणि त्यांनी ट्विटरवरून तिला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. इतकेच नाही तर तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकण्याची धमकीही दिली. यावेळी, जूनियर एनटीआरच्या चाहत्यांनी या अभिनेत्रीचे पालक कोरोना व्हायरसने मरणार असल्याचे सांगितले आणि मीराला एक पॉर्न स्टार देखील म्हटले.

 

मीराने ज्युनियर एनटीआरला टॅग केले
मीरा चोप्रानेही ज्युनियर एनटीआरला टॅग केले आणि विचारले की,’ मी महेश बाबूंची फॅन आहे तुमची नाही म्हणून तुम्ही मला शिवी घालत आहात का ? मीराने असे लिहिले आहे की,’ आशा आहे की तुम्ही माझ्या ट्विटकडे दुर्लक्ष कराल.’ मात्र, अद्यापही ज्युनियर एनटीआरकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या वादानंतर लोकांनी मीरा चोप्राला ट्विटरवर पाठिंबा दिला आहे आणि #WeSupportMeeraChopra चा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मीरा चोप्राच्या समर्थनार्थ महेश बाबू, पवन कल्याण आणि असीम रियाज यांचे फॅन्सही बाहेर आले आहेत.

मीराने या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे
मीरा चोप्रा ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची चुलत बहीण आहे. मीराने बॉलिवूडमध्ये तसेच तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. मीराने ‘गँगस ऑफ घोस्ट्स’, ‘१९२० लंडन’ आणि ‘कलम ३७५’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.