Take a fresh look at your lifestyle.

‘क्विन का जेल ऐसा, ना चलेगी भाईगिरी, ना पापा का पैसा’; कंगनाच्या ‘लॉकअप’मध्ये 16 सेलिब्रिटी अडकणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यंत्नर आता तिच्या बोलीला एक सरळ मार्ग म्हणून एकटा कपूर एक नवा शो घेऊन येतेय. ज्याचं नाव आहे, ‘लॉक अप‘. या शोचं होस्टिंग कंगना करणार आहे. एकता कपूरचा हा नवा कार्यक्रम Alt Balaji आणि MX Player या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२२ पासून रसिकांना हा कार्यक्रम पाहता येईल. याचा टीझर अलीकडेच रिलिज झाला असून प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MX Player (@mxplayer)

टीझरमध्ये कंगना हटके अंदाजात पहायला मिळतेय. तर टीझरमधूनच समजतंय कि कंगना या कार्यक्रमाची ओरिजिनल ‘क्विन’ आहे. तिच्या लॉकअपमध्ये १६ सदस्य असणार आहेत आणि तेही कॉट्रोव्हर्सीतले मास्टर सेलिब्रिटी असणार आहेत अशी घोषणा कंगनाने केली आहे. शिवाय कंगना पहिल्यांदाच कोणत्यातरी धमाकेदार रिअ‍ॅलिटी शोचे होस्टिंग करताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये भयंकर चर्चा आणि उत्साह आहे. कंगना अशीही तिच्या विधानांमुळे चर्चेत असतेच. यानंतर आता होस्ट म्हणून चर्चेत राहील इतके नक्की.

‘लॉक अप’ या शोचा टीझर आऊट झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा टीझर शेअर करताना लिहिले होते कि, “क्विन का जेल है ऐसा, ना चलेगी भाईगिरी ना पापा का पैसा”. कंगना रनौतचा हा नवा रिअ‍ॅलिटी शो ‘लॉक अप’ येत्या २७ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. पण तुम्ही सज्ज आहात का? नसाल तर लगेच सज्ज व्हा आणि MX Player किंवा Alt Balaji यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमांतून आनंद लुटण्यास तयार व्हा.