Take a fresh look at your lifestyle.

‘दिल चाहता है’ ला 19 वर्षे पूर्ण ; फरहानने शेअर केला एक ‘खास’ व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना या तिघांवर चित्रित झालेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाला आज 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. फरहान अख्तर दिग्दर्शित दिग्दर्शित या चित्रपटाने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. प्रेमाव्यतिरिक्त चित्रपटात मैत्रीचे चित्रण खूप सुंदरपणे केले गेले आहे. चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण झाल्यावर फरहान अख्तरने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये चित्रपटाची मजेदार दृश्ये आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना फरहानने लिहिले- ’19 वर्षांनंतर, आकाश, सिद आणि समीर मित्र होते, आणि नेहमीच राहतील. पटकथेपासून कथेपर्यंत या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर यांनी केले होते. पटकथामध्ये कासिम जगमगिया यांनी त्यांना सहकार्य केले होते तर फरहानने रितेश सिद्धवाणी यांच्या मदतीने चित्रपटाची निर्मिती केली होती. दिल चाहता है प्रचंड हिट चित्रपट होता.120 मिलियनच्या बजेटमध्ये बनविलेल्या ‘दिल चाहता है’ चा बॉक्स ऑफिस कलेक्शन 456 मिलियन होता.

चित्रपटाविषयी बोलायच म्हणलं तर आमिर खानने आकाशची , सैफ ने समीरची भूमिका आणि अक्षयने सिदची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रिती झिंटा, डिंपल कपाडिया आणि सोनाली कुकर्णी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात तीन मित्रांची कहाणी आहे ज्याच्या आयुष्यातील वळण आणि गमती मजेदार मार्गानी दाखवल्या आहेत.

Comments are closed.