Take a fresh look at your lifestyle.

आमिरने शेअर केला मुलगी इरा सोबतचा १६ वर्षांपूर्वीचा एक फोटो…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । आमिर खानची मुलगी इरा खानने फेब्रुवारी महिन्यात नाताळमधील एक सुंदर फोटो शेअर केला आहे.या थ्रोबॅक फोटोमध्ये इरा बरीच लहान दिसत आहे, तर आमीर लांब केस आणि मिश्यामध्ये दिसत आहे. बातमीनुसार फोटो वर्ष २००४ मधील आहे. आमिर त्याच्या ‘मंगल पांडे’ या चित्रपटातील लुक मध्ये दिसला आहे,तर त्याची पत्नी किरण रावही लाल ड्रेस मध्ये दिसत आहे.

इरा खानने शेअर केलेला हा फोटो ख्रिसमस पार्टी दरम्यानचा आहे.फोटोमध्ये आमिर आपल्या मुलीला गिफ्ट देत आहे. इराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘सैंटा का हेल्पर.. ।’.

 

आमिर खान लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वत: आमिर खान यांनी केली असून अद्वैत चंदन यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.त्याने याआधी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.’लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते टॉम हॅन्क्स यांच्या १९९४ च्या हॉलिवूड ब्लॉकबस्टर फिल्म ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत रिमेक आहे.

हा चित्रपट यावर्षी नाताळ ला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये करीना कपूर देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. यापूर्वी आमिर आणि करीना ‘३ इडियट्स’ आणि ‘तलाश’ मध्ये एकत्र दिसले आहेत.

Comments are closed.

%d bloggers like this: