Take a fresh look at your lifestyle.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात 5 नातेवाईकांचा मृत्यू

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांवर काळाने आणखी एक आघात केला आहे. एकाचवेळी त्याच्या कुटुंबातील एकूण ५ व्यक्तींचे निधन झाल्याची अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. रस्ता अपघातात हे मृत्यू झाल्याची माहिती आहे. मंगळवारी सिकंदरा – शेखपुरा एनएच- ३३३ वर हलसी पोलीस ठाणे क्षेत्रातील पिपरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. हा अपघात ट्रक आणि सूमो यांमध्ये झाला असून हा अपघात इतका भीषण होता की यात जागीच ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमर उजाला वृत्तानुसार, या अपघातामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचे पती लालजीत सिंह यांचादेखील मृत्यू झाला आहे. ते हरियाणामध्ये एडीजी पदावर कार्यरत होते. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सुशांत राजपूतच्या बहिणीचे पती हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश सिंग यांचे चार नातेवाईक ठार झाले आहेत. ओमप्रकाश सिंह यांच्या बहिणीचा अंत्यसंस्कार केल्यानंतर, सुशांतच्या बहिणीचा पती, त्यांची दोन मुले आणि मुलीसह एकूण १० लोक सुमो व्हिक्टामधून प्रवास करत होते. जे अंत्यसंस्कार करून पाटणाहून त्यांच्या घरी परतत होते.
तर यांपैकी ५ जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सुशांतच्या ज्या नातेवाईकांचा समावेश आहे, त्यांची नवे खालीलप्रमाणे:-
– लालजीत सिंह (बहिणीचे पती)
– अमित शेखर उर्फ नेमानी सिंह
– रामचंद्र सिंह
– बेबी देवी
– अनिता देवी
यांसह वाहन चालक प्रीतम कुमार याचाही मृतांमध्ये समावेश आहे.

तसेच मृत सहा जणांव्यतिरिक्त गाडीत असणारे इतर ४ जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. या जखमींना सिकंदरा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तेथून २ जणांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना पीएमसीएच (पाटणा) येथे रेफर करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. लखीसरायचे एसपी सुशील कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि तपासाअंती सुमोमध्ये १० जण असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. सुरुवातीला फक्त मृत सहा लोकांबद्दल बोलले जात होते. मात्र तपस पूर्ण झाल्यानंतर गाडीत एकूण १० लोक उपस्थित असल्याची माहिती समोर आली.