Take a fresh look at your lifestyle.

मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘8 दोन 75’ चित्रपटाला 50 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आणि अनोखे शीर्षक असलेला ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. असे म्हणण्याचे कारण असे कि, या चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ५० पेक्षाही अधिक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळविल्याच्या कामगिरीचा कौतुक सोहळा संपन्न झाला आहे. या चित्रपटात अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, विजय पटवर्धन, डॉ.निखिल राजेशिर्के अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट आहे. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहून कलाकार म्हणून दिसेल.

उदाहरणार्थ निर्मित ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाच्या अनोख्या शीर्षकाने आधीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर या चित्रपटाचा टिझर गेल्यावर्षी लाँच झाला होता. यानंतर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने ५० हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. यात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन, सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट निर्माता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा सर्व विभागात चित्रपटाने पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटाचे निर्माता सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे आहेत. तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलात.

देश आणि परदेशातील कोणत्याही भाषेत आजवर अवयवदान या विषयावर चित्रपट झालेले आपण पाहिले असतील. मात्र ‘8 दोन 75: फक्त इच्छाशक्ती हवी’ हा देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा, हा महत्वाचा आणि विशेष मराठी चित्रपट आहे. आजवर फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील फेस्टिव्हल्स मध्ये ह्या चित्रपटाला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चित्रपटाची पटकथा शर्वाणी- सुश्रुत यांनी लिहिली आहे. तर संजय मोने यांनी संवाद लेखन केले आहे. याशिवाय वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांचे संगीत दिग्दर्शन आहे.