Take a fresh look at your lifestyle.

’83’चा डंका हिमालयाच्या शिखरावर; लेह- लडाखच्या सर्वांत उंच मोबाईल थिएटरमध्ये चित्रपट झाला रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षित चित्रपट ‘83’ हा २४ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम देण्यास सुरुवात केली आहे. ’83’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून या चित्रपटाचं कथानक भारताच्या विश्वचषक विजयाचा प्रवास दाखवणारं आहे. संपूर्ण चित्रपट हा भारताचे विश्वचषकातील सामने आणि टीम स्पिरीटवर आधारलेला असल्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी आहे. रिलीजनंतर चित्रपटाला उत्तम रिव्ह्यू मिळत असून प्रेक्षकांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. यानंतर अत्यंत आनंदाची बाब म्हणजे हा चित्रपट जगातील सर्वात उंच मोबाईल चित्रपटगृहामध्ये ११,५६२ फूट उंचावर लेह-लडाखमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हिमालयाच्या शिखरापर्यंत ’83’ पोहोचणे हि अत्यंत अभिमानाची बाब आहे, यात काही शंकाच नाही. दरम्यान लडाखमध्ये शून्य डिग्री सेल्सिअसच्या खाली तापन असल्यामुळे मोबाईल थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक हीटिंगची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षक आरामात याठिकाणी चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. हा चित्रपट पाहण्यासाठी लडाखच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातील प्रेक्षक देखील पहायला येऊ शकतात. ’83’ अरुणाचल प्रदेश आणि हिसार या ठिकाणीदेखील मोबाईल चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. याविषयी निर्मात्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

निर्माते कबीर खान म्हणाले, ’83’ चित्रपट लडाखमध्ये ११,५६२ जगातील सर्वात उंच चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. हे शानदार आहे. मी प्रेक्षकांकडून हा चित्रपट कसा वाटला या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. लडाखला हे केवळ माझ्या चित्रपटासाठी विशेष स्थान नाही, तर ते माझ्या हृदयाच्या जवळ आहे. कारण कॉलेजच्या दिवसांमध्ये मी इकडे ट्रेकिंग करण्यासाठी काही महिने राहिलो आहे.” तर निर्माते शामिल शिबाशिष म्हणाले, ’83’ हा चित्रपट आमच्या मेहनतीचे फळ आहे. मी खूप खुश आहे की, हा चित्रपट या थिएटरमध्येदेखील प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट जगातील सर्वात उंच ठिकाणी देखील पोचला. एक चांगला चित्रपट पाहण्याचा अनुभव देखील एक मोठं स्वप्न आहे. हे क्षण माझ्यासाठी खूप खास आहेत.”