हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक रुग्णांना योग्य वेळेत गरजेचे उपचार मिळत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. यामुळे आता मराठी कलाकार कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मराठी कलाकारांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव महाकोविड असे आहे. हे नाव महाराष्ट्र आणि कोविड असे दोन शब्द मिळवून महाकोविड असे तयार करण्यात आले आहे. #mahacovid हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.
कोरोना संदर्भात बेड, प्लाझ्मा, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सह इतर कोणत्याही गरजेच्या गोष्टी मिळण्यात जर कुणाला अडचण येत असेल, तर आपली गरज #mahacovid या हॅशटॅगसह जोडा, असे आवाहन मराठी सेलिब्रेटींनी केले आहे. स्वप्निल जोशीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात पुढील काही दिवस तो खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करणार नसून केवळ कोव्हिडबाबत सकारात्मक आणि मदतीसंबंधीत बातम्या पोस्ट करणार आहे. mahacovid या हॅशटॅगचा वापर करून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
Vaccine availability in Mumbai as of today 🙏
Source @mybmc @fayedsouza
Please share.#MahaCovid #MumbaiCovid pic.twitter.com/YT0945OpkI— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) April 26, 2021
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सुद्धा या मोहिमेत सहभागी आहे. नुकतीच तिने ट्विटर पोस्ट मध्ये #mahacovid चा वापर करीत मुंबईत व्हॅक्सिन उपलब्ध झाल्याची माहिती दिली आहे. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, समीर विद्वांस, हेमंत ढोमे यांसारख्या सेलिब्रेटींंनी mahacovid हा हॅशटॅग वापरत सोशल मीडियावर विविध पोस्ट केल्या आहेत. मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये ते लिहितात की, ज्यांना लस विकत घेणं परवडणारं आहे. अशा लोकांनी ही लस मोफत न घेता विकत घ्यावी जेणेकरून याचा पैसा कोव्हिडच्या इतर कारणासाठी वापरता येईल. समीर विद्वांस यांनी आनंदी गोपाळ, डबलसीट या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Discussion about this post