हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे सध्या संपूर्ण राज्यात लोकडाऊन आहे, यामुळे अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकललया. तर काहींनी कोरोनाच्या नियमांनुसार कमीत कमी पाहुणे आणि कमीत कमी वेळात लग्न उरकले आहे. अनेकजण लग्नाचा कोणत्याही पद्धतीने गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने लग्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच वाढदिवसाचे औचित्य साधून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे आणि आता ती तिच्या पतीसोबत दुबईतच सुखी संसार थाटत आहे. गेल्यावर्षी वाढदिवसाच्याच दिवशी सोनालीने साखरपुडा केल्याचे सांगितले होते. तर यावर्षी ३३व्या वाढदिवसाचे निमित्त साधून लग्न केल्याचे जाहीर केले आहे.
सोनाली आणि कुणालला लॉकडाऊनमुळे लग्नाची तारिख पुढे ढकलावी लागली होती. या दोघांचे लग्न ठरल्याप्रमाणे युकेत होणार होते. पण कोरोनामुळे ते काही शक्य झाले नाही. अखेर दुबईतच हिंदू मंदिरात चार लोकांच्या साक्षीने सोनाली आणि कुणाल बोहल्यावर चढले. ७ मे २०२१ रोजीच सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करीत तिच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली आहे.
सोनाली आणि कुणाल दोघांच्याही आई-वडिलांनी त्यांना ऑनलाईन पद्धतीने आशिर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. म्हणजे अर्थातच सोनाली आता कायमची दुबईकर झाली, असे म्हणायला काही हरकत नाही. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करीत तिने हि बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. या फोटोंवर तिचे चाहतेही अगदी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिचे दुबईतले सासर अगदी आलिशान असून याआधी तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अगदी स्पष्ट दिसत आहे.
लग्नानंतर सोनालीने आता दुबईत संसाराला सुरुवात केली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोनाली घरात वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसली होती. अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून सोनालीने चाहत्यांसह संपर्क साधला होता. कधी वर्क आऊट, तर कधी किचनमध्ये पदार्थ शिजवताना ती दिसली होती. तर कधी याच घरात ती तिच्या निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळाली. तिचे हे सगळे व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून तिच्या सासरच्या घराची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. अनेकदा चाहते तिच्या घराचे कौतुक करताना दिसले. सोनालीचे दुबईतील घर अतिशय आलीशान आहे. त्यामुळे अगदी कुणाचंही लक्ष आकर्षित होऊन तोंडून वाव, अमेझिंग, फॅन्टास्टिक आणि अतिसुंदर असे शब्द निघणे स्वाभाविक आहे.
Discussion about this post