Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रंगभूषाकार रविंद्र समेळ यांचा पुढाकार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ravindra Samel
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. अशा या कठीण परिस्थितीत सुद्धा काही मंडळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मदतीसाठी पुढे येत आहेत. कलाकारां प्रमाणे आता पडद्यामागील कलाकारही या मदत कार्यात पुढे आले आहेत. मनोरंजन सृष्टीत रंगभूषाकार म्हणून कार्यरत असलेले रविंद्र समेळ आज अनेकांना बेड पासून ते ऑक्सिजन पर्यंत मदत पुरवण्याचे काम करत आहे.

त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाट्य रंगभूषाकार म्हणून केली. त्यानंतर अनेक नाटकासाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले. नाटकानंतर त्यांनी आपली गाडी चित्रपटसृष्टीकडे वळवली. सध्या ते मेकअप डिझायनर म्हणून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. हे सर्व करत असताना सामाजिक कर्तव्याचे भान मात्र त्यांनी नेहमीच लक्षात ठेवले आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेक सिनेकामगारांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी रविंद्र यांनी त्या कामगारांना अन्न धान्य पुरवले होते. तसेच अनेकांना आर्थिक मदतीचा हातसुद्धा दिला होता. यानंतर आता कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असता या परिस्थितीत अनेकांचे मनोबल वाढवण्यासाठी रविंद्र समेळ कार्यरत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ravindra Ramakant Samel (@ravimakeupdesigner)

 

रोजंदारीवर काम करणारे लोक लॉकदौंमुळे घरात बसून आहेत. अशा काळात चित्रपट आणि मालिकासाठी काम करणाऱ्या लोकांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. रविंद्र समेळ आपल्याकडील माहिती आणि संसाधनाच्या मदतीने सध्या अनेकांची मदत करत आहेत. सिनेकर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला ही कोरोनाची लागण झाली तर त्याला योग्य वेळेत बेड मिळवून देणे आणि त्याची योग्य ती सोय करणे यासाठी रविंद्र स्वतः लक्ष देत आहेत. आपल्या सभोवताली फार नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आपणच आपली काळजी घेणार नाही तर कोण घेणार, आपण स्वतःहून पुढे येऊन आपल्या आवाक्यात आहे ते करू शकतो. आपल्या जवळच्या लोकांचे दुःख आपण जाणतो अशा वेळी मदतीचा एक हात पुढे करणे आपले कर्तव्य आहे. मी केलेली मदत हे समाजाने आपल्याला जे दिले आहे त्याची एका अर्थाने परतफेड आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र सामील यांनी दिली.

Tags: covid 19Covid 19 EraHelps People In Covid EraMake Up ArtistRavindra Samel
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group