हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, गत वर्षापासून कोरोना नामक विषाणूने संपूर्ण राज्यावर कश्या पद्धतीने थैमान घातले आहे. अद्यापही संपूर्ण जग या संकटातून मुक्त झालेले नाही. त्यात कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी देशात वारंवार लॉकडाऊनच्या पर्यायाचा अवलंब केला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सर्व गोष्टी हळू-हळू पूर्वपदावर येत असल्या तरीही प्रत्येक क्षेत्राचे आणि त्या क्षेत्रातील अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त सर्वसामान्य जनतेलाच नाही तर अनेको सेलिब्रिटींना देखील आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. असाच टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अरिंदम प्रमाणीक ह्याला हाती काम नसल्यामुळे अगदी मासेविक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावण्यात येत असल्याने अनेक लोकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान सिनेजगतातील प्रसिद्ध कलाकारांनादेखील त्यांचे क्षेत्र सोडून पोटाची भूक आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. टॉलीवूड सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अरिंदम प्रमाणीककडे देखील सध्या काम नसल्यामुळे त्याच्यावर मासे विकण्याची वेळ आली आहे. या संदर्भात बोलताना अरिंदम यांनी सांगितले की, ‘माझे वडील आधी बर्दवान जिल्ह्यातील मेमारीमध्ये भाज्या विकायचे. पण मला एक प्रसिद्ध अभिनेता व्हायचं होतं. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात पाय ठेवला तेव्हा माझ्या बाबांनी भाज्या विकण्याचं काम केलं नाही. पण आता पुन्हा माझ्यावर तीच वेळ आली आहे. अभिनय सोडून कुटुंबासाठी मला त्याच बाजारात आता मासे विकावे लागत आहेत.’
टॉलिवूड अभिनेता अरिंदम प्रमाणिक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक विविध कथानकाच्या चित्रपटांमध्ये आणि अगदी टीव्ही मालिकांमध्येदेखील विविधांगी मुख्य आणि त्याचसह सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. पण आता लॉक डाऊनच्या नियमावलीप्रमाणे सिनेसृष्टीतील काम ठप्प आहेत. परिणामी पापी पेट का सवाल म्हणून अरिंदम मेमारी बाजारामध्ये मासे विकत आहेत. कारण आता मासे विकण्याशिवाय त्यांच्याकडे अन्य दुसरा पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. तसे पाहाल तर, फक्त अरिंदमच नव्हे त्यांच्याशिवाय अन्य अनेक कलाकारांनी अभिनय सोडून दुसऱ्याच व्यवसायांची वाट धरली आहे.
Discussion about this post