मुंबई | अभिनेत्री स्वरा भास्कर अशा अभिनेत्रींपैकी आहे जी पॉलिटिकल आणि सोशल टॉपिक्सवर आपले मत मांडत असते. यामुळे ती अनेकदा ट्रोलही झाली आहे. असेच काहीसे पुन्हा पाहायला मिळत आहे. जेव्हा स्वराने एक आर्टीकल शेअर करत लिहिले आहे की, ‘मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवले आहे.’
स्वराने शेअर केलेल्या ट्विटमध्ये ती म्हणाली होती की, ‘मुघल विजेत्यांच्या रुपात भारतात आले आणि परंतु ते उपनिवेशवादी नाही तर भारतीय म्हणून आठवले जातात. त्यांनी व्यापार, विकसित रस्ते, समुद्र मार्ग, बंदरांना प्रोत्साहन दिले. मुघलांच्या काळात हिंदू सर्वात श्रीमंत होते.’ यानंतर स्वरा ट्रोल होण्यास सुरुवात झाली.
काही युजर्स म्हणाले की, ‘मुघल हे लुटेरे आहेत आणि त्यांनी देशातील अनेक हिंदूंची हत्या केली आहे.’ काही युजर्स म्हणाले की, ‘राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे, मंगल पांडे यांसारखे लोक काय वेडे होते का ?’ एका युजरने लिहिले की, ‘मुघलांबद्दल फक्त एकच गोष्ट चांगली आहे आणि ती म्हणजे त्यांनी देशाचं तितकं नुकसान नाही केलं जितकं इंग्रजांनी केलं होतं.’ मुघलांचं समर्थन केल्याने अनेक लोक स्वरा भास्करवर नाराज आहेत.
Discussion about this post