हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षपासून कोरोनामुळे राज्यभरातील बऱ्याच क्षेत्रांची घडी जणू विस्कटून गेल्याचे दिसले. पण आता हळूहळू सर्व काही पूर्ववत होतेय का काय असेच वाटू लागले आहे. कारण राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता शाळा, मंदिरे यांच्यानंतर राज्यातील सिनेमागृह देखील सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. यानुसार येत्या २२ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व सिनेमागृह सुरू होतील. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Theatres and auditoriums in Maharashtra will open after 22nd October 2021 while observing all COVID safety protocols. SOP is in the works and will be declared soon.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 25, 2021
चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला आहे. कोरोनाची ओसरती कळा पाहून नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी आता ठाकरे सरकारनं दिली आहे. त्यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून आनंदाची एक हलकीशी सर जाणवू लागली आहे.
दरम्यान, यापूर्वी राज्यातील शाळा आणि मंदिरे सुरू करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला होता. शाळा ४ ऑक्टोबर २०२१ पासून तर मंदिरे ७ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर कलाकारांनी इतका जल्लोष व्यक्त केला आहे कि सोशल मीडियावर जो तो आनंद व्यक्त करीत आहे. साहजिकच बऱ्याच काळानंतर पुन्हा रुपेरी पडदा उघडणार यातच सर्वाना आनंद आहे.
Discussion about this post