Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉस मराठी 3; अक्षय गेला, आदिश आला आणि पहिल्याच दिवशी राडा झाला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 11, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सिजनचे तिसरे पर्व एकदम धडाक्यात सुरु झाले आणि आता या शोने चांगलाच टीआरपी ओढला आहे. दररोज नवनवीन टास्क आणि घरातलं पहिलं नॉमिनेशन यामुळे आता खेळाला खरीखुरी सुरुवात झाल्यासारखे वाटत आहे. अक्षय वाघमारे या सेलिब्रिटी स्पर्धकाला अवघ्या तीन ते चार आठवड्यातच घरातून बाहेर पडावं लागलं.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

त्यामुळे या पर्वातून बाहेर पडणारा अक्षय हा पहिला स्पर्धक ठरला आहे. पण अक्षय घराबाहेर जाताच अभिनेता आदिश वैद्यने घरात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे घरात आल्या आल्या आदिशने खेळी खेळली आणि त्याचा पहिला डाव टाकला. इतकंच काय तर आल्या आल्या त्याने गृह्प्रवेशासह राड्यांची सुरुवात केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर आजच्या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आदिश त्याचा पहिला डाव टाकताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याने खेळलेली हि खेळी घरातील अन्य ३ स्पर्धकांना दररोज रात्री घराच्या मुख्य दरवाजाजवळ पहारा द्यायला लावणारी आहे. त्याच झालं असं कि, आदिशने प्रवेश करताच बिग बॉसने त्याला पॉवर कार्ड निवडण्याची संधी दिली आणि हि संधी स्वीकारल्यामुळे घरातील कोणत्याही ३ सदस्यांची रात्रीच्या वेळी पहारेकरी म्हणून निवड कर असे आदेश बिग बॉसने दिले. मग काय? कोणीतरी ३ स्पर्धक आदीशने निवडणे आणि मग झाला राडा सुरु. पुढील प्रोमो व्हिडिओमध्ये आदिश आणि जय एकमेकांसोबत भिडल्याचे पाहायला मिळाले आणि वातावरण एकदमच गरमा गरमीचे झाले. उफ्फ.. आता येणार खरी मजा कारण, एक नवा सदस्य, नवी संधी, नवे टास्क आणि नवा जिगरा पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अभिनेता आदिश वैद्य मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील खूप लोकप्रिय नाव आहे. त्याने ‘रात्रीस खेळ चाले १’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’, ‘जिंदगी नॉट आऊट’ सारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘सेक्स वेब ड्रग्स आणि थिएटर’ या मराठी वेब सीरिजमध्येही त्याने काम केले आहे. सध्या तो ‘गुम है किसी की प्यार मे’ या हिंदी मालिकेत काम करताना दिसत होता. पण कदाचित बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने हि मालिका नुकतीच सोडली आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाणे, सुरेखा कुडची, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे हे स्पर्धक चुरशीने खेळताना दिसत होते. यानंतर अक्षयच्या एलिमिनेशननंतर आणि आदिशच्या एंट्रीनंतर घरातली सूत्र बदलली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही.

Tags: Aadish VaidyaAkshay waghmareBigg Boss Marathi 3colors marathiEliminationInstagram PostJay DudhaneMarathi ActorsWild Card Entry
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group