हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात किर्तनकार शिवलीला पाटील यांनी स्पर्धक म्हणून मोठ्या उत्साहाने भाग घेतला. मात्र यानंतर कुठेतरी त्यांच्यावर त्यांच्याच वारकरी संप्रदायातून मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शिवलीला आजारी काय पडल्या आणि घराबाहेरही झाल्या. अगदी स्वखुशीने स्वमर्जीने मी हे घर सोडतेय असे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे तब्येतीच्या तक्रारीचे कारण देऊन बाहेर पडलेल्या शिवलीला यांचा कीर्तनाचा कार्यक्रम लगेचच आयोजित झाल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले आणि संप्रदायसुद्धा. होय कारण या कीर्तनाला वारकरी संप्रदायाने जोरदार विरोध केला आणि आयोजकांवर गुन्हाही दाखल झाला. याबाबत बोलताना शिवलीला यांनी खंत व्यक्त केली आहे.
मराठी बिग बाॅसच्या तिसऱ्या पर्वात कीर्तनकार शिवलीला पाटील अत्यंत चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यानंतर शिवलीला यांनी प्रकृतीचे कारण देऊन बिग बॉसचे घर तर सोडले पण घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना प्रचंड रोष पत्करावा लागला आहे. अशातच शिवलीलाचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुलडाणा येथे शिवलीला यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी वारकरी सांप्रदायने या कार्यक्रमाला जंगी विरोध केला. मात्र, तरी देखील आयोजकांनी कीर्तन रद्द केलं नाही. यामुळे ३ आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर स्पष्टीकरण देताना शिवलीला पाटील यांनी आपल्या मनातील काही गोष्टींचा उलघडा केला आहे.
महिला कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी आपली खंत व्यक्त करत म्हटले कि, बिग बाॅसच्या घरात जाऊन मी चूक केली. मात्र मी तिथं राहून वारकरी संस्कृतीचं दर्शन घडवलं. मी अभंग गायले. ज्ञानेश्वरीदेखील वाचली. तसेच बिग बाॅसच्या घरात जाऊन देखील मी माझी वारकरी संस्कृती सोडली नाही. मात्र, केवळ एक महिला कीर्तनकार असल्याने वारकरी सांप्रदाय मला विरोध करत आहे. असे म्हणत शिवलीला पाटील यांनी स्पष्टीकरण देताना मनातली गोष्ट मंडळी. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाला २००हून अधिक लोकांचा जमाव पाहायला मिळाला. जे कोरोना नियमांचा भंग असल्यामुळे कोरोना काळात गर्दी जमवून न देण्याचा आदेश असताना असे कृत्य घडल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं जिल्हाधिकऱ्यांनी सांगितले आहे.
Discussion about this post