हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात दणाणणारे प्रकरण म्हणजे कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान NCB च्या अटकेत आहे. दरम्यान अनेको राजकीय पक्ष यात उद्या घेताना दिसत आहेत. NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे जे क्रांती रेडकरचे पती आहेत त्यांच्या बहिणीवर अनेकांनी आरोप केले असून यावर उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्रकार परीषद घेण्यात आली. दरम्यान गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आश्वासन दिले.
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर या पत्रकार परिषदेत म्हणाले की, महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आमच्या चित्रपट सेनेत काम करणाऱ्या जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला होता. जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. मनसे चित्रपट सेनेवर आरोप केले त्याचे पुरावे आहेत का? एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का? असा सवाल खोपकर यांनी केलाय. मनसे जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचंही खोपकर यांनी आवर्जुन सांगितलं. त्याचबरोबर समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरच्या पाठीशीही मनसे उभी आहे. याआधी एनसीबीवर टीका करणाऱ्यांवर क्रांती रेडकरने सोशल मीडियावर पोस्ट करून टीकाकरांना सडेतोड उत्तरे दिले होते. त्याचप्रमाणे एनसीबीच्या कामाचे कौतुक करण्यांचे आभार देखील मानले होते.
https://www.instagram.com/p/CU23plpBGF1/?utm_source=ig_web_copy_link
या पोस्टमध्ये क्रांतीने म्हटले होते की, तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. विशेष करून एनसीबीचे प्रयत्न, त्यांचे सततचे छापे, निर्भिड मेहनत ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने जेव्हा बॉलिवूडचा संबंध येतो तेव्हाच लोक बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबी करत असलेल्या स्तुत्य कार्याचे रिपोर्टिंग माध्यमातून सातत्याने होत आहे. गुंडांना पकडण्याचे त्यांचे कामसुद्धा तुम्हा सर्वांपर्यंत पोहचेल आणि तुमचा पाठिंबा, प्रेम असेच वाढत जाईल अशी आशा करते.
समाजत असे काही घटक आहेत जे बॉलिवूडवर निशाणा साधल्याचे म्हणत एनसीबीला दोष देत आहे. मी त्यांना विनंती करते की कृपया आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि नंतर टीका करा. ते दररोज संघर्ष करत असताना आपण आपल्या घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोनमधून अशा टिप्पणी देतो. निःस्वार्थपणे देशाची सेवा करण्यासोबत चांगले वागूयात.
Discussion about this post