हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुक केले आणि यानंतर असा काही वाद उफाळला कि बस. गांधींना मारल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो, असे ते म्हणाले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे हे मोठ्या पडद्यावर त्याच नथुराम गोडसेची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे चाहत्यांनी आनंदी व्हायचं का कष्टी असा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ असे या चित्रपटाचे नाव असून, तो येत्या ३० जानेवारी २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=ygfbYwAr0AU
खरंतर हा चित्रपट २०१७ सालचा आहे. परंतु या चित्रपटावरून आता नवीन वाद उफाळतो का काय अशी काहीशी भीती व्यक्त केली जात आहे. या चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेतला असला तरी अमोल कोल्हे यांची भूमिका थेट आणि स्पष्ट आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमोल कोल्हे म्हणाले कि, ‘२०१७ साली केलेला ‘Why I killed Gandhi’ हा चित्रपट Limelight OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे यात मी नथुराम गोडसे या भूमिकेत आहे म्हणून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तर उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेले वाक्य आठवते ‘हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही आणि तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही!’ या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे, ‘Reel लाईफ’ आणि ‘Real लाईफ’ यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा’.
त्यामुळे एक कलाकार म्हणून मी भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतात ज्यांच्या विचारधारेशी आपण सहमत असतो तर काहींशी नसतो. मात्र कलाकार म्हणून त्या साकारताना समाधान मिळते. जेव्हा अशा भूमिका समोर येतात तेव्हा व्यक्ती बाजूला सारत कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही, तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा आदर करीत या कलाकृतीकडे पहावे ही अपेक्षा.
Discussion about this post