हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे नेहमीच त्यांच्या अभिनयासह परखड वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. मध्यंतरी बैलगाडा शर्यतींसाठी झुंज देण्यासाठी आणि त्याहीआधी नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यामुळे ते माध्यमांमध्ये गाजताना दिसले. या काळात त्यांनी ऐतिहासिक मालिकांच्या माध्यमातून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी महाराज विसरणे शक्य नाही. या भूमिकांनी अमोल कोल्हे यांना एक वेगळीच ओळख मिळवून दिली. यानंतर आता मोठा ब्रेक घेत त्यांनी आगामी चित्रपटात नवी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे शीर्षक ‘विठ्ठल विठ्ठला’ असे असून नुकतेच याचे पोस्टर लॉन्च झाले आहे.
अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्यजननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आज प्रेक्षक त्यांना याच भूमिकांमुळे ओळखू लागले आहेत. ते दिसताच क्षणी चाहते मुजरा करतानाही दिसले आहेत. हीच काय ती कामाची पोचपावती. यानंतर आता अनेक दिवसांनी मोल कोल्हे एक वेगळी भूमिका घेऊन प्रेक्षकांसमोर उभे राहणार आहेत. त्यांच्या ‘विठ्ठल विठ्ठला’ या आगामी मराठी चित्रपटात ते विठूरायाची भूमिका साकारणार आहेत. अद्याप अशी अधिकृत घोषणा केली नसली तरीही पोस्टर लॉन्च सोहळ्यादरम्यान कमरेवर हात आणि चेहऱ्यावर मोहक हास्य असणारे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरून अमोल कोल्हे विठुरायाच्या भूमिकेत दिसणार असा अंदाज लावला जात आहे.
अभिनेता डॉ. अमोल कोल्हे स्टारर ‘विठ्ठल विठ्ठला’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांच्यासह अन्य कोणते कलाकार दिसतील याविषयीची ताहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवलेली आहे. याचा उलघडा हळूहळू होईल असे सांगण्यात आले आहे. चॉक अँड डस्टर , नटसम्राट या चित्रपटाचा गुजराती रिमेक , गुजरात ११ तसेच हल्की फुलकी इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. माहितीनुसार, “रणभूमी” या चित्रपटानंतर पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे आणि जयंत गिलाटर ‘विठ्ठल विठ्ठला’ या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काम करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती संगिता अहिर, बालागिरी वेठगिरी आणि जयंत गिलाटर करणार आहेत. तर चित्रपटाचे संगीत डब्बू मलिक करणार आहेत.
Discussion about this post