Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dharmendra
0
SHARES
21
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्याविषयी अत्यंत महत्वाची बातमी समोर येतेय. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अस्थिर असल्याचे समजत होते. यानंतर आज अचानक तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. मात्र, अद्याप देओल कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांची मुलं सनी देओल आणि बॉबी देओल हे त्यांना गुपचूप हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्याचे समजत आहे.

गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीच्याच आठवड्यात अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने समजले होते. दरम्यान त्यांनी सोशल मिडीआयवर एक व्हिडीओ पोस्ट करीत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. याशिवाय त्यांनी आपल्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे आपल्या पाठदुखीचा त्रास झाल्याचे सांगितले होते. मात्र, यानंतर आता पुन्हा एकदा ८६ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याचे समजत आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या धर्मेंद्र करण जोहरच्या रॉकी और रानी या चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त होते. मात्र आता त्यांची प्रकृती अचानक बिघडली असून चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीची काळजी करीत त्यांनी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करीत आहेत.

https://www.instagram.com/reel/CdBdXdarLpC/?utm_source=ig_web_copy_link

वयाच्या ८६ व्या वर्षी देखील धर्मेंद्र तंदुरुस्त असताना त्यांच्या तब्येत अचानक खालावणे हि जरा गंभीरच बाब आहे. मनाने नेहमीच चिरतरुण राहणारे धर्मेंद्र नेहमीच फिट आणि फाईन दिसून येतात. आजही ते चित्रपटांमध्ये काम करीत आपल्या चाहत्यांचे प्रेम मिळवताना दिसतात. चित्रपटांसोबतच ते मुंबईतील फार्म हाऊसवर शेती करतानाही दिसतात. धर्मेंद्र यांची दिनचर्या देखील अगदी बुस्टिंग आहे. मात्र वयोमानानुसार येणाऱ्या त्रासांपासून ते काही वेगळे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून स्नायूंचे दुखणे वाढण्याची तक्रार त्यांना जाणवत होतीच. याचसाठी ते उपचारार्थ रुग्णालयातही दाखल झाले होते. पण काही दिवसांतच ठणठणीत धर्मेंद्र रॉक करताना दिसले. याहीवेळी त्यांची प्रकृती लवकर सुधारून ते बरे व्हावे अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.

Tags: Admitted In HospitalBollywood Senior ActorBreach Candy HospitaldharmendrainstagramViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group