Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Happy Birthday सोनम कपूर! रॉयल आऊटफिटमध्ये अभिनेत्रीने केलं बेबी बंप फोटोशूट; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Sonam Kapoor
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या हटके आणि बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. आज ९ जून असून आज सोनमचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस तिचा आहे. आपल्या मनाजोगते कपडे परिधान करणे सोनम नेहमीच पसंत करते. त्यात आता सोनम आईपणाच्या उंबरठ्यावर असल्यामुळे हव्याहव्याशा नियमांच्या बंधनात अडकली आहे. पण आयकॉनिक फॅशनसाठी जी अभिनेत्री प्रसिद्ध आहे ती फॅशनची साथ कशी सोडणार..? म्हणूनच तिने बेबी बंप फोटो शेअर केले आहेत. मुख्य म्हणजे तिने तिला हवे तसे कपडे याहीवेळी परिधान केले आहेत. त्यामुळे तिची आणि तिच्या फोटोंची चर्चा एकदम जोरदार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

अभिनेत्री सोनम कपूरने बेबी बंप दर्शविणारे हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. तिने सोबत अतिशय सुंदर असे कॅप्शनही लिहिले आहे. सोनमने यात लिहिलंय कि, मातृत्वाच्या उंबरठ्यावर आणि माझ्या वाढदिवसाच्या उंबरठ्यावर, मी मला कसे वाटते ते कपडे घालणे निवडत आहे. गर्भवती आणि शक्तिशाली, बोल्ड आणि सुंदर… सोनमच्या या फोटोवर अनेक चाहते आणि तिचे मित्र तसेच बॉलिवूड सेलिब्रिटी विविध कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनमने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले आहेत. ज्यामध्ये सोनम अगदीच रॉयल दिसतेय. या लूकमध्ये तीच गर्भारपण आणि त्याच सुख तिच्या चेहऱ्यावर अगदी खुलून आलं आहे. तिचा रॉयल अंदाज तिच्या फोटोंना आणखीच आकर्षक आणि लक्षवेधी बनवित आहेत. आज तिचा वाढदिवस असल्यामुळे ती आधीच चर्चेत होती. त्यात आता बेबी बंप फोटोशूट शेअर केल्यामुळे आणखीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर अनेकांनी तिला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय तिच्या सौंदर्याची तारिफदेखील केली आहे.

Tags: Baby BumpBollywood ActressInstagram PostSonam KapoorViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group