हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता डॉ.अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते असले तरी त्यांनी आपल्यातला कलाकार नेहमी जिवंत ठेवला आहे. विविध ऐतिहासिक भूमिकांमधून ते नेहमीच आपल्या चाहत्यांच्या भेटीला इतिहासाचे सुवर्ण पान घेऊन येत असतात. मात्र राजकारणात गेल्यापासून त्यांचा मनोरंजनाकडील कल कमी होऊन सामाजिक विषयांवर भर वाढल्याचे दिसले. यामुळे अनेकदा वादातही त्यांचे पाऊल पडले. यानंतर आता ‘आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे?’ या पोस्टमुळे कोल्हे पुन्हा चर्चेत आले आहेत. या पोस्टमुळे अनेकांनी अनेक प्रकारच्या शंका व्यक्त केल्या आहेत. ज्याचे उत्तर याच पोस्टमध्ये दडले आहे.
अमोल कोल्हेंची हि पोस्ट ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या निमित्ताने केलेली आहे. यामध्ये कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात त्यांनी माहिती दिली होती आणि टिझर रिलीज केला होता. यानंतर आता ही पोस्ट.. युगासोबत एक व्हिडीओ दिसत आहे. ज्यामध्ये ते ट्रॉलीच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगचे लाल किल्ल्यातील अनुभव शेअर केले आहेत.
या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी लिहिलंय की, ‘अशा वातावरणात शूटींग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका…. पण प्रत्यक्ष इतिहास जणू ३५६ वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहणार होता.. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात ३८- ४० डिग्री असलं तरी ७०% आर्द्रतेमुळे ४२-४४ वाटणारं तापमान ते ही सकाळी ९ वाजता, चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून base camp पर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा..रोज ४-५ जण अंथरूण धरायचे नाहीतर थेट हॉस्पिटल मध्ये.. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ या ईर्षेने शूटिंग सुरु…”
पुढे लिहिलंय कि, ‘पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीम मधील सेटिंग boys, spot boys, light boys, costume dept, direction team, camera team ani junior artists चं..कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते.. महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले, अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि ३५६ वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते…’Strenght of a Chain is judged by the strength of weakest link in the chain’ या उक्ती प्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते आणि आमचा टीम leader, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंढे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय ठेवून उभा होता..मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता..आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रोखून ताठ मानेने उभी होती… शतकानुशकं अजरामर प्रेरणा – छत्रपती शिवाजी महाराज!’
अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांची हि पूर्ण पोस्ट वाचल्यावर अनेकांच्या मनातील शंकांचे निरसन झाले असावे. पण यातून समजत कि, इतिहासपर कथांचा आधुनिकरित्या पाठपुरावा करणे आणि त्याचे चित्रीकरण करून प्रेक्षकांसमोर प्रसिद्ध करणे हे सार काही किती कष्टदायी आहे. हा अनुभव काही औरच आणि याचा आनंद.. शब्दात व्यक्त न होणारा असेल यात काहीच शंका नाही.
Discussion about this post