हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राजकारणात सक्रिय असलेले मराठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. विविध ऐतिहासिक भूमिकांमधून ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना नेहमीच दिसतात. यानंतर लवकरच ते ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या टिझरनंतर यातील पहिले दमदार गाणे रिलीज झाले आहेत. मुख्य म्हणजे या गाण्याला प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचे सूर लाभले आहेत. या गाण्याचे नाव ‘बम बम भोले’ असे आहे.
अंगाला भस्मविभूती फासलेल्या, जटाधारी साधूंच्या जबरदस्त नृत्यविष्काराने या गाण्याची रंगात आणखीच वाढवली आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. महाविरागी सदा अभोगी करीत त्रिलोक विहार सबसुख त्यागी स्मशान योगी भोले विश्वाधार ‘बम बम भोले, बभूतवाले बम बम भोले’ अशी अतिशय दमदार शब्दरचना गीतकार ऋषीकेश परांजपे यांनी केली आहे. तर संगीत शशांक पोवार यांनी दिले आहे आणि आवाज कैलाश खेर यांचा आहे. शिवाय नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे यांचे आहे. तर छायांकन संजय जाधव यांचे आहे.
‘शिवप्रताप गरुडझेप’ यामध्ये एक नवा थरार अनुभवायला मिळणार आहे. जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित हा चित्रपट घेऊन येतोय आग्र्याहून सुटकेचा थरार. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम यांनी केले आहे. या चित्रपटाची विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा दिसून येणार आहेत. दर्जेदार गाणी, टोकदार संवाद आणि थरारक ॲक्शन घेऊन लवकरच हा चित्रपट याच वर्षात सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post