बॉक्स ऑफिस पॉलिटिक्स । मागच्या वर्षात रिलीज झालेला शेवटचा चित्रपट म्हणजे गुडन्यूज. गुडन्यूजने तिसऱ्या आठवड्यात २०० करोडचा मोठा आकडा पार केला. पहिल्या आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार केला होता. सुपरस्टार अक्षय कुमार, करीना, दिलजीत आणि कियारा यांचा गुड न्यूज चित्रपट सुट्ट्यांच्या मदतीने बॉक्स ऑफिसवर अजूनही लूट करतोय. बऱ्याच दिवसांनी चांगला विनोदी चित्रपट आल्याने त्यात रिलीज वेळच्या आठवडत्यात वीकेंड्स सोबत न्यू इयर मुळे लोकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.
चित्रपटाची संकल्पना आणि कथा खूप रंजक असल्याने लोकांनी माऊथ पब्लिसिटी केली, त्यामुळे चित्रपटाने हे यश बघितले. २०१९ हे बॉलीवूड साठी खूप चान्गले वर्ष गेलं असून २०१९ मधला हा २०० कोटी कमवणारा शेवटचा चित्रपट ठरला. अक्षयकुमारची ही सलग सहावी सेंच्युरी आहे. जुन्या स्टार्स मध्ये त्याचे स्टारडम वाढत जाताना आपल्याला दिसतंय. अक्षय कुमारने २०१९ मशे १००० कोटी कमवण्याचा विक्रम नावावर केला आहे, त्यात हि अजून भर.
तान्हाजी आणि छपाक या दोन मोठ्या चित्रपटांनी मागच्या दोन आठवड्यातील गुड न्यूज च्या बॉक्स ऑफिस कलेक्शन वर मोठा परिणाम केला. तरीही तान्हाजी च्या सुसाट घोडयांसमोर टिकाव धरून २०० करोडचा आकडा पार करणं हि गोष्टही तितकीच कौतुकास्पद आहे.