Box Office | अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्डस् मोडीत काढत ‘तान्हाजी’नें भारतात, तेही फक्त हिंदी आवृत्तीने आज २०० करोड रुपये कमावले. महाराष्ट्रात तर लोकांनी तान्हाजीला डोक्यावर घेऊन ब्लॉकबस्टर घोषित केला. अवघ्या १५ दिवसात तान्हाजीनं ही २ अब्जची बाजी मारली. असं करणारा तो आजपर्यंतचा २४ वा चित्रपट ठरला. या आधी २०० करोड क्लब मधला शेवटचा चित्रपट म्हणजे लास्ट इयर रिलीज झालेला अक्षयकुमारचा गुड न्यूज. २०२० मधला तान्हाजी हा पहिला २०० कोटी कमवणारा चित्रपट आहे.
या शुक्रवारी रिलीज झालेले स्ट्रीट डान्सर आणि पंगा हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसं प्रदर्शन करतात यावरही तान्हाजीचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. पंगा चित्रपटाचे रिव्यू चांगले असून लोक येणाऱ्या आठवड्यात त्याला प्राधान्य देतील असा अंदाज आहे; मराठी भाषेतील आवृत्तीने साधारण ३८ करोड कमावल्याचे दिसून येते. ‘तान्हाजी’ अजून साधारण २० कोटी कमवू शकेल असा अंदाज आहे.
तान्हाजीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. चित्रपटात ती अजून भव्यदिव्य आणि आक्रमक दिसते. चित्रपटात ऍक्शन दृश्यांवर खूप कष्ट घेतलेले दिसतात. यात सर्व आक्रमकतेची भावना सुरवातीपासून शेवट वपर्यंत ठेवली आहे. महाराष्ट्रात प्रेक्षक त्याला डोक्यावर घेत आहेतच, पण पूर्ण देशही यातून पूर्ण मनोरंजीत होतोय.
चित्रपटाविषयी बरेच वाद विवाद झाले, अनेक राज्यात चित्रपट टॅक्स फ्री झाला या सगळ्याचे परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर होतच असतात. बघू आता ‘तान्हाजी’ अजून किती मजल मारतो ते !