हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान यावेळी मात्र परफेक्ट तोंडावर पडला. कारण लोकप्रियतेवर चित्रपट चालतो हे सारेच जाणतात. पण आमिरच्या प्रसिद्ध असण्यामुळे त्याचा चित्रपट सपशेल आपटला. यानंतर आता ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप का झाला..? यावर सिनेसृष्टीत मोठी चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर बॉयकॉट मोहीम सुरु झाली होती. यामुळे चित्रपटाविषयी आधीच नेटकरी नकारात्मक आहेत हे दिसून आलं. याविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपली भावना व्यक्त करत आमिरवरच संताप व्यक्त केला आहे.
खरंतर अभिनेता आमिर खानने ४ वर्षानंतर सिल्व्हर स्क्रीनवर कमबॅक केलं होतं. पण लोकांनी मात्र त्याला आणि त्याच्या चित्रपटाला टोटल बॉयकॉट केल्याचे पहायला मिळाले. इतकेच काय तर यशस्वी व्हावी अशी कथा असतानाही ‘लाल सिंग चड्ढा’च्या हाती निराशा आली आणि यानंतर बायकोत बॉलिवूड देखील ट्रेंड होताना दिसला. त्यामुळे दिग्गजांनी यावर आता भाष्य केले आहे. अनुपम खेर हे सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मीडियाच्या काही पोर्टल्सने अनुपम यांना ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाबाबत काही प्रश्न विचारले.
या मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांनी आमिर खानवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले कि, ‘लाल सिंग चड्ढाच्या बॉयकॉट ट्रेंडसाठी कुठे ना कुठे जबाबदार हा स्वतः आमिर खान आहे. कारण जर कोणाला वाटतं की बॉयकॉट ट्रेंड सुरू करायला हवा, तर तसं करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ट्वीटरवर रोजच नवनवीन ट्रेंड येतच असतात. आमिरने २०१५ मध्ये असहिष्णुता संदर्भात एक वक्तव्य केले होते. दरम्यान त्याने जर आधीच विचार केला असता तर… तुम्ही जर तुमच्या भूतकाळात चुकून काही बोलून गेला असाल तर त्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक ठरतातच.
आमिर २०१५ साली नवी दिल्लीतील ‘रामनाथ गोयंका एक्सीलेंस इन जर्नलिझम अवॉर्ड्स’मध्ये म्हणाला होता की, ‘तो देशात होणाऱ्या घटनांविषयी चिंतीत आहे. तर त्याची पत्नी किरण रावने देखील त्याला सुचित केलं आहे की आपल्याला भारत देश सोडायला हवा. यावरून अनुपम खेर यांनी देखील आमिरला झापलं होत. ट्विटमधून त्यांनी म्हटलं होत कि, ‘तू किरण रावला विचारलं का, तिला कुठल्या देशात जायचं आहे..? तू तिला सांगितलस का की या देशानेच तूला द आमिर खान बनवलं आहे?’
Discussion about this post