हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवीचा २६ ऑगस्ट रोजी ४२वा वाढदिवस झाला. मोठ्या उत्साहात तिने सोशल मीडियावर स्वतःच स्वतःला शुभेच्छा देत आपलं खरंखुरं वय चाहत्यांना सांगितलं. तशी हेमांगी अतिशय सामान्य आयुष्य जगते. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक असामान्य स्वप्न असतंच. जे सत्यात अवतरलं तर अव्यक्त आनंद होतो. तसंच हेमांगीच्या बाबतीत झालं. हेमांगीचा नवरा तिच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करायचं म्हणून तिला घेऊन थेट मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये तिला घेऊन गेला. कधीकाळी ताजकडे पाठ फिरवून हातातला घोटभर चहा फुरके मारत पिणाऱ्या हेमांगीनेही कधीतरी ताजमध्ये २००-३०० रुपयाचा चहा पिण्याचं स्वप्न पाहिलं होत. ते स्वप्न ताजमध्ये नुसता चहाच नाही तर जेवण करून पूर्ण झालं आहे. याचा आनंद तिने भलीमोठी पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे.
अभिनेत्री हेमांगी कवीने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हि पोस्ट शेअर केली आहे. यासोबत तिने आपले फोटोसुद्धा शेअर केले आहेत. यामध्ये हेमांगीने चहा पितानाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंमध्ये ताज हॉटेलच्या खिडकीतून दिसणारा गेट वे सुद्धा अधून मधून डोकावताना दिसतो आहे. हेमांगीने लिहिलेल्या पोस्टमध्ये तिचा आनंद झऱ्यासारखा वाहतो आहे. सोबत तिने नेहमीप्रमाणे एकदम खास अशी तळटीपसुद्धा दिली आहे. यात तिने लिहिलं आहे कि, ‘त.टी.: मध्यम वर्गीय माणूसच जास्त show off करतो याची मंडळाने नोंद घ्यावी!’
यावर एका नेटकऱ्याने लिहिले कि, ‘अप्रतिम हेमांगी जी.खर तर हा लेख मी खुप काळजीपूर्वक वाचत असताना मलाही ताज ची सफर घडवली त्याबद्दल आभार, सर्वसामान्य परिस्थिती असताना न परवडणारा खर्च परवडणारा झाला तरी आपल्या मानसिकतेला न परवडणारा असतो, अगदी वाचल्यानंतर आता ताज ची चहा प्यायलाच हवी असं वाटायला लागले आणि लवकरच जाणार आहोत.’
तर अन्य एकाने लिहिले कि, ‘अमेझिंग.. नेहमी दिसण्यावरच प्रेम होत अस नाही, काहीवेळा माणूस लिखाणाच्या ही प्रेमात पडतो. शब्दाची पकड खूप छान आहे तुझ्याकडे. तुझ्या यशासाठी अभिनंदन..’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘हे आवडलं आपल्याला… एवढ्या मोठ्या उंचीवर असूनही पहिल्यांदा येणारा अनुभव आमच्यसारखाच म्हणजे मिडल क्लास माणसासारखा सांगितला… लोकांमध्ये हेच दुर्मिळ होत जाणार आहे, तुम्ही टिकवून ठेवलं… अभिनंदन’
Discussion about this post