‘तान्हाजी’समोर नव्या चित्रपटांचा लागेना टिकाव !
बॉक्स ऑफिस । तान्हाजीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. चित्रपटात ती अजून भव्यदिव्य आणि आक्रमक दिसते. चित्रपटात ऍक्शन दृश्यांवर खूप कष्ट घेतलेले दिसतात. यात सर्व आक्रमकतेची भावना सुरवातीपासून शेवट वपर्यंत ठेवली आहे. महाराष्ट्रात प्रेक्षक त्याला डोक्यावर घेत आहेतच, पण पूर्ण देश अजूनही यातून पूर्ण मनोरंजीत होतोय. ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर जोरदार कमाई केली. ही कमाई आता ४६ दिवसांनंतरही सुरूच आहे. ‘तान्हाजी’नंतर बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. या नव्या चित्रपटांचं आव्हान असतानाही ‘तान्हाजी’ने कमाईचा २७५ कोटींचा टप्पा पार केला आहे.
रिलीज नंतरच्या सातव्या आठवड्यात ‘तान्हाजी’ने शुक्रवारी ५२ लाख, शनिवारी ६३ लाख तर रविवारी ७४ लाख रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २७६.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपये कमावले होते तर सहा दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला होता. ही फक्त भारतातील कमाई आहे. परदेशातही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
सोबत चित्रपटाविषयी बरेच वाद विवाद झाले, अनेक राज्यात चित्रपट टॅक्स फ्री झाला या सगळ्याचे परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर होतच असतात. बघू आता ‘तान्हाजी’ अजून किती मजल मारतो ते !
‘तान्हाजी’ची कमाई –
३ दिवसांत – ५० कोटी
६ दिवसांत – १०० कोटी
१० दिवसांत – १५० कोटी
१५ दिवसांत – २०० कोटी
१८ दिवसांत – २२५ कोटी
२४ दिवसांत – २५० कोटी
४२ दिवसांत – २७५ कोटी