हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान तब्बल २१ महिन्यांच्या कालावधीसाठी आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी लोकांच्या मूलभूत अधिकारांवर कठोर अंकुश ठेवण्यात आला होता. याच घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री कंगना रनौतने केलं आहे. या चित्रपटाचे नाव इमर्जन्सी असे आहे. या चित्रपटातील एक एक पात्र हळूहळू उलघडत आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतसह, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि आताच समोर आलेल्या पोस्टरनुसार अभिनेता विशाक नायरदेखील यामध्ये दिसणार आहे. हे कलाकार या चित्रपटातील अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, सॅम माणेकशॉ, पुपुल जयकार आणि आता संजय गांधी यांच्या भूमिकेचे नवीन पोस्टर लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये अभिनेता विशाक नायर दिसतो आहे.
अभिनेत्री कंगना रनौतने या भूमिकेविषयी भावना व्यक्त केली आहे. तसेच या भूमिकेची प्रेक्षकांना ओळख करून दिली आहे. हे नवे पोस्टर शेअर करत कंगनाने लिहिले आहे की, ‘संजय हे श्रीमती गांधींच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत. यासाठी मला अशा एका व्यक्तीची गरज होती, ज्यामध्ये निरागसता अबाधित राहील आणि त्याच वेळी ती हुशारही दिसेल. त्या व्यक्तीला विविध छटा असणे आवश्यक होतं. संजय गांधी यांच्या भूमिकेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून कलाकाराचा शोध सुरू होता. विशाकचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून त्याला अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. तो या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल, असा मला विश्वास आहे.
मुख्य म्हणजे, अभिनेत्री कंगना रनौतचा धाकड हा सिनेमा तोंडावर पडूनही ती मागे हटली नाही. उलट ती एक नवा चित्रपट घेऊन पुन्हा नव्या जोमाने उतरली आहे. विशेष सांगायचे म्हणजे, यावेळी ती फक्त एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून इंडस्ट्रीत काम करत आहे. होय. इमर्जन्सी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः कंगनाने केले आहे. शिवाय या चित्रपटातील मुख्य आणि महत्वपूर्ण भूमिका दिवंगत माजी महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका ती स्वतः साकारत आहे. तर संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसतो आहे. त्याने याआधी काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र बॉलिवूड साठी हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे.
Discussion about this post