हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । टायगर श्रॉफ एकामागून एक अॅक्शन चित्रपट घेऊन येत आहे. आधी ‘वॉर’, नंतर ‘बागी ३’ आणि आता ‘हिरोपंती २’. टायगर श्रॉफने २०१४ मध्ये आलेल्या ‘हीरोपंती’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात कृती सॅनॉन टायगरच्याबरोबर दिसली होती. आता लवकरच टायगर हीरोपंती २ घेऊन येत आहे. शुक्रवारी टायगरने आपल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.पोस्टरमध्ये टायगर काळ्या सूटमध्ये बंदूक घेतलेला दिसत आहे.
टायगरने ‘हिरोपंती २’ चे पोस्टर शेअर केले, आणि लिहिले- हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझे गुरू साजिद सर यांच्यासमवेत या फ्रेंचायझीचा हा दुसरा चित्रपट आहे त्याबद्दल मी आभारी आहे.
दुसर्या पोस्टरमध्ये टायगर काळ्या सूटमध्ये फिरत असून त्याच्याभोवती अनेक बंदुका आहेत.
साजिद नाडियाडवाला ‘हिरोपंती २’ निर्मिती करीत आहे.’हिरोपंती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर खान यांनी केले होते. आता ‘हिरोपंती २’ चे अहमद खान दिग्दर्शन करीत आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार प्रॉडक्शन हाऊसचा टायगर आणि अहमद यांच्या जोडीवर पूर्ण विश्वास आहे. या दोघांची ही जोडी यावेळीही बॉक्स ऑफिसवर काहीतरी कमल दाखवेल.
‘हिरोपंती २’ चे शूटिंग मे२०२० मध्ये सुरू होईल. हा चित्रपट १६ जुलै २०२१ रोजी प्रदर्शित होईल. सध्या टायगर आपल्या आगामी ‘बागी ३’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बागी ३ मध्ये श्रद्धा कपूर टायगर बरोबर दिसणार आहे.