हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गुरुवारी राज्यात ‘करवा चौथ’ हे पवित्र व्रत स्त्रियांनी आपल्या पतीसाठी ठेवले होते. दरवर्षी हे व्रत सणासारखे साजरे केले जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयूसाठी हे निर्जल व्रत करतात. रात्री चाळणीत चंद्राचा चेहरा पाहिल्यानंतर आपल्या पतीचा चेहरा पाहतात आणि पतीच्या हातून पाणी पिऊन हे व्रत सोडतात. यंदा बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफनेदेखील हे व्रत केले होते. लग्नानंतरचा पहिला करवा चौथ कॅटरिनाने पती विकी कौशल आणि सासरच्या मंडळींसोबत साजरा केला.
अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर लग्नानंतरच्या पहिल्या वहिल्या ‘करवा चौथ’ व्रताचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कॅटरिनाने गुलाबी रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. शिवाय तिच्या भांगेत सिंदूर आणि हातात चूडा सुद्धा दिसतोय. इतकेच नव्हे तर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणखीच लक्ष वेधून घेत आहे. या भारतीय पेहरावात कॅटरिना कैफ परफेक्ट मिसेस कौशल दिसते आहे. या फोटोंमध्ये एक फोटो तिने ‘करवा चौथ’च्या पूजा थालीसोबत शेअर केला आहे. तर अन्य फोटोंमध्ये ती विकी आणि त्याच्या कुटुंबासोबत दिसते आहे.
कॅटरिनाने शेअर केलेल्या या फोटोंसोबत तिने ‘पहला करवा चौथ’ असे कॅप्शन दिले आहे. तर या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने कमेंट्सचा आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. याशिवाय सिने इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी तिला पहिल्या ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी विकी आणि कॅटरिना यांनी गुपचूप लग्न केलं होत. यानंतर थेट मिसेस कौशल माध्यमांसमोर आली होती. लग्नानंतर अनेकदा ती आणि विकी विविध कार्यक्रमांसाठी एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांच्या लग्नाचा एक सुंदर ग्लो दोघांच्याही चेहऱ्यावर नेहमीच दिसतो. शिवाय कॅटरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लग्नानंतर किती आनंदी आहे हे स्पष्ट दिसत आहे.
Discussion about this post