हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Happy Birthday Amruta Khanvilkar) मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयासह आपल्या नृत्यासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करतेय. होय. आपली अम्मू चाळीशीजवळ आली. पण आजही तिच्या चेहऱ्यावरील तेज, तिच्या सौंदर्यातील मादकता, तिच्या हास्यातील गोडवा आणि अदाकारीतला दिलखेचक अंदाज जीवाला घायाळ करतो. विविध भूमिकांमधून आपल्याला शंभर नंबरी सोनं म्हणून सिद्ध करणारी अमृता हे यश गाठताना काय आणि कसा प्रवास करून आली आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
अमृता खानविलकरचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ साली पुण्यात झाला. खानविलकरांच्या घरात एका गोड चिमुकल्या परीने जन्म घेतला तेव्हा ती इतकी मोठी सेलिब्रिटी होईल असा कुणीच अंदाज लावला नसेल. कदाचित या बाळाचे पाय कुणी पाळण्यात पाहिलेच नसतील. अमृताच्या वडिलांचे नाव राजू तर आईचे नाव गौरी खानविलकर. अमृताला अदिती नावाची एक लहान बहीणसुद्धा आहे बरं का.. त्यामुळे घरात अमृता दीदी आहे. अमृताने तिचे शालेय शिक्षण अशोक अकॅडमी, मुंबई येथे पूर्ण केले आणि पुढे सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबईतून तिने वाणिज्य आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. (Happy Birthday Amruta Khanvilkar)
अमृताने २००६ साली ‘हि गुलाबी हवा’ म्हणत पूर्वा या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. बॉल्ड, फॅशनेबल आणि लविंग अंदाजातील पूर्वा सगळ्यांनाच भावली. पण अमृताला खरी ओळख मिळाली ती रवी जाधव दिग्दर्शित ‘नटरंग’ या चित्रपटात ‘वाजले कि बारा’ गाण्यामुळे. आतापर्यंत अमृता खानविलकर लोकांना माहित होती. पण या गाण्यानंतर अमृता बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये वाढीस लागली. (Happy Birthday Amruta Khanvilkar) वाजले कि बारा या गाण्यावरील अमृताची लावणी इतकी ठसकेबाज होती कि त्याचा ठसका भल्याभल्यांना लागला. याचे कारण म्हणजे, मुळात या गाण्यासाठी अमृताची निवड झालीच नव्हती. होय. कुणी दुसरीच अभिनेत्री हे गाणे करणार होती. मात्र काही कारणास्तव तिला ते शक्य झाले नाही आणि अमृताच्या पदरी संधी आली.
वाजले कि बारा या गाण्याच्या अगदी शूटच्या आदल्या दिवशी अमृताचं सिलेक्शन झालं आणि अमृताने हे गाणं चांगलंच वाजवलं. इथून एका वेगळ्याच लेव्हलला अमृता येऊन पोहोचली होती जे कदाचित तिलाही समजलं नसेल. अगदी टर्निंग पॉईंट म्हणावा तसं हे गाणं अमृताच्या आयुष्यात आलं आणि तीच नशिबचं पालटलं. यानंतर अमृताने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या. काही चित्रपटांमध्ये केवळ आपली नृत्य कला सादर केली. पण काही म्हणा अमृताने जिंकलंच. यानंतर २०२२ सालात अमृताची चंद्रा झाली आणि तिने लावणीला एका वेगळ्याच उच्चांकावर नेऊन ठेवलं. (Happy Birthday Amruta Khanvilkar)
प्रसाद ओक दिग्दर्शित आणि विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी‘ चित्रपटाने अमृताची चंद्रा केली. या चित्रपटातील तिची आणि घुंघरांची गट्टी प्रेक्षकांना प्रचंड भावली. चंद्रा हे गाणे तर सात समुद्रापार जाऊन पोहोचले. (Happy Birthday Amruta Khanvilkar) इतकेच काय तर.. ‘बाई गं’ या गाण्यातील अमृताच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव डोळे मिटून आठवले तरीही अंगावर शहारा येतो. इतकी जीव ओतून तिनं चंद्रा साकारली. या भूमिकेने तिला प्रेक्षकांच्या आणखीच जवळ नेलं. आज असंख्य प्रेक्षक तिला चंद्रा याच नावाने ओळखत आहेत. मुख्य म्हणजे लहानापासून वृद्धापर्यंत सगळेच चंद्राच्या प्रेमात आहेत.
(Happy Birthday Amruta Khanvilkar) पण एक व्यक्ती आहे जिच्या चंद्रा प्रेमात आहे. हि व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अमृताचा पती हिमांशु मल्होत्रा आहे. ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या शोमधून हिमांशू अमृताच्या आयुष्यात आला आणि यानंतर तिचाच झाला. या शोमध्ये २००४ साली त्यांची मैत्री झाली. शो संपला पण मैत्री तशीच होती.
रोज एकमेकांना नव्याने ते ओळखत होते. पुढे १० वर्ष एकमेकांसोबत सूर जुळवून त्यांनी २४ जानेवारी २०१५ साली लग्न केलं. पण हि जोडी खऱ्या अर्थाने ‘नच बलिये’ या शोच्या माध्यमातून जगासमोर आली. हिमांशूला डान्सचा डसुद्धा माहित नसताना त्याने अमृतासाठी सहभाग घेतला आणि त्यांनी हा शो जिंकला. हि लव्हस्टोरी आजही अनेकांसाठी उदाहरण म्हणून वापरली जाते.
तर अशी होती… अमृताची आतापर्यंत लाइफस्टोरी… थोडं स्ट्रगल.. थोडी मेहनत.. थोडं अपयश.. सगळं थोडं थोडं करत आज तिनं खूप काही मिळवलं आहे. आज ती एक उत्तम अभिनेत्री आहे. नृत्यांगना आहे. मुलगी, बहीण, बायको आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून ती खऱ्या आयुष्यातही अनेक भूमिका अव्वल साकारत आहे. तिची हि प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया! (Happy Birthday Amruta Khanvilkar)
Discussion about this post