Take a fresh look at your lifestyle.

‘नटरंग उभा…’ अमृता खानविलकरच्या अदा पाहून जो तो झाला फिदा; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची आणि अत्यंत लोकप्रिय अशी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या लूक आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. कधी फिटनेस फ्रिक अमृता कठीण कठीण योग पोझेसमूळे चाहत्यांची मन जिंकते तर कधी तिच्या मनमोहक आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने ती चाहत्यांवर हाये.. मार डाला रे अशी परिस्थिती आणते. यानंतर आता पुन्हा एकदा तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिने अमृतकला ही सीरिज सुरू केली आहे. यात ती वेगवेगळ्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेको लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

 

अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती नटरंग चित्रपटातील लोकप्रिय गाणे नटरंग उभा यावर थिरकताना दिसत आहे. या गाण्यातील तिच्या मनमोहक अदा आणि तिचा सुंदर पेहराव पाहून चाहते फिदा झाले आहेत. या व्हिडिओत तिच्यासोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील देखील थिरकताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अभिनयासह फॅशन आणि फिटनेसबाबत अमृता खूप ऍक्टिव्ह आहे. तिच्या हटके स्टाईलचे अनेको दिवाने आहेत. यामुळे ती स्वतःचे फोटो नेहमीच चाहत्यांसह शेअर करताना दिसते.

अमृताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहाल तर तुम्हाला तिच्या विविध अदा कॅमे-यात कॅप्चर झालेल्या दिसतील. सोशल मीडियावर अमृता बरीच अॅक्टिव्ह असल्याने तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती शेवटची ऍमेझॉन प्राईमवरील ‘वेल डन बेबी’ या मराठी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मराठी अभिनेता पुष्कर जोग दिसला होता. यानंतर आता अमृता आगामी चित्रपट पाँडिचेरीमध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता वैभव तत्ववादी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णीदेखील दिसणार आहेत.