हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मालिका विश्वातील अनेक कलाकार आपल्या आपल्या भविष्यासाठी आपलं कुणीतरी अर्थात जीवांसाठी शोधत आहेत. अनेकांना त्यांचे साथीदार मिळाले तर अनेकांचे शोध सुरु आहेत. ज्यामुळे मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत असे म्हणायला हरकत नाही. अलीकडेच २ डिसेंबर रोजी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे विवाहबद्ध झाले. तर त्याच दिवशी आशय कुलकर्णीने आणि सानिया गोडबोले यांनीही लग्नगाठ बांधली. तर सुमित पुसावळेनेही साखरपुडा उरकला. यानंतर आता आता मराठी मालिका विश्वातील आणखी एका अभिनेत्याने गुपचूक साखरपुडा केल्याचे समोर आले आहे.
स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘लग्नाची बेडी’मधील अभिनेता संकेत पाठक याचा नुकताच साखरपुडा झाल्याचे समोर आले आहे. सुपर्णा श्यामसह संकेतने गुपचूप साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली आहे. यानंतर आता लवकरच संकेत आणि सुपर्णा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याने हि पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘…आणि आम्ही हो म्हणालो. आता पुढील आयुष्याची वाटचाल एकत्र करणार आहोत… कधी, कुठे, केव्हा…? लवकरच सांगू’
संकेतची होणारी बायको सुपर्णा श्याम हीसुद्धा एक अभिनेत्री असून तिने काही नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. तर संकेत पथक सध्या ‘लग्नाची बेडी’ मालिकेतून राघव हि मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या आधीही त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे या दोघांचाही चाहता वर्ग मोठा आहे. संकेतने आपल्या आयुष्यातील अत्यंत गोड क्षणाची माहिती सोशल मीडियावर देताच त्याच्या चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा अभिनंदनपर वर्षाव केला आहे.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post