हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । कोरोना व्हायरस केवळ चीनमध्येच नाही तर जगातील बर्याच देशांमध्ये पसरला आहे. कोरोना विषाणूनेही भारताचेही दार ठोठावले आहे. आतापर्यंत भारतात २८ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ३बरे झाले आहेत. उर्वरित २५ लोकांपैकी १६ परदेशी आणि ९ भारतीय आहेत. बॉलिवूडलाही कोरोना विषाणूची चिंता सतावते आहे. याबाबत चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे.
राम गोपाल वर्मा यांनी लिहिले – “कधी वाटले नव्हते मृत्यूदेखील मेड इन चाइना असेल.” बरेच लोक राम गोपाल वर्मा यांचे हे ट्विट शेअर करत आहेत.
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 3, 2020
आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिनेही कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याची सूचना केली आहे. मास्क घातलेला फोटो शेअर करताना तिने लिहिले- दिल्लीची ट्रिप. विमानतळावर येताच मी सर्वजण मास्क घातलेले पाहिले. हे पाहून मला चिंता वाटतीये. आपण कसे जगतो आहोत पृथ्वीचे काय झाले आहे?
रणबीर कपूर, वरुण धवन, सनी लिओनिसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विमानतळावर मास्क घालताना दिसले आहेत. कोरोना व्हायरसमुळे दीपिका पादुकोणनेही तिची पॅरिसची सहल रद्द केली. तिला लुई व्हिटनच्या फॅशन वीक २०२० मध्ये हजेरी लावायची होती.