हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील चिरतरुण, हसरे अभिनेते अशोक शिंदे यांनी नेहमीच विविध माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नायक, सहनायक यासह अगदी खलनायकदेखील त्यांनी साकारला पण प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नाटक, चित्रपट, मालिकां अशा विविध प्लॅटफॉर्मवर त्यांनी अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. शिवाय श्रेष्ठ व्यक्तिमत्व, लक्षवेधी अभिनय आणि दिलखुलास स्वभाव यामुळे त्यांनी मनोरंजन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या प्रवाही कारकिर्दीचा सन्मान करीत यंदाचा ‘नटश्रेष्ठ निळू फुलेस्मृति’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
एका कलाकारासाठी कोणताही सन्मान हा मोठाचा असतो. त्यामुळे या पुरस्काराची बातमी पसरताच अशोक शिंदे यांच्या चाहत्यांमध्ये आनंदी आनंद पसरला आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या विशेष लोकांना ‘नटश्रेष्ठ निळूफुले आर्ट फाउंडेशन’तर्फे ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृति पुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कारासाठी त्यांनी यंदा अभिनेते अशोक शिंदे यांची निवड केली आणि त्यांना सन्मानित केले. या पुरस्काराचा वितरण सोहळा ८ जानेवारी २०२३ रोजी शेतकरी सदन सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संपन्न झाला.
या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेते अशोक शिंदे यांनी सांगितले कि, ‘नटश्रेष्ठ निळू फुले या महान कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. या अशा पुरस्कारांमुळे काम करायला बळ मिळते. माझा होत असलेला हा सन्मान खरंच माझ्यासाठी आनंददायी आहे. अभिनेते अशोक शिंदे हे मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन नट आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आजवर त्यांनी २२५ चित्रपट, १५० मालिका आणि ५० हून अधिक नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
Discussion about this post