हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला विविध धाटणीचे चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव हे नेहमीच इतर कलाकृतींचे देखील कौतुक करताना दिसतात. अलीकडेच १३ जानेवारी २०२३ रोजी ‘वाळवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर रवी जाधव यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि लोकांना हा चित्रपट ‘पहा आणि एन्जॉय करा’ असे सांगितले आहे. आपल्याला हा चित्रपट कसा वाटला हे सांगताना त्यांनी हि पोस्ट शेअर केली आहे.
रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘आज रविवार, आज आपण एक उत्कृष्ट मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन आपल्या सुट्टीचा आनंद द्विगुणीत करु शकता! ‘वाळवी’ या चित्रपटाचे कौतुक आपण अनेक मान्यवरांकडून ऐकले असेलच त्यामुळे त्यावर अधिक काही न बोलता बोलून मी एवढच सांगेन की हा चित्रपट लवकरात लवकर म्हणजे आजच्या आजच थिएटर मध्ये जाऊन पहा आणि इन्जॉय करा!!! परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे सर्वच अप्रतिम!!! झी स्टुडिओच्या मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील आणि संपुर्ण टिमला हा चित्रपट सादर केल्याबद्दल प्रचंड प्रेम!!! मराठी चित्रपटांच्या नावाने चांगभलं’
झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद हे परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कथानक काय असेल याची उत्सुकता वाढविण्यात आली आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट असून अतिशय वेगळ्या पद्धतीने याच्या कथानकाची मांडणी करण्यात आली आहे.
Discussion about this post