हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ फेम कॉमेडी अभिनेत्री श्रेया बुगडे ही जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच उत्तम माणूस आहे. केवळ सहकलाकार नव्हे तर खऱ्या आयुष्यातील खरी नातीदेखील ती सौम्यपणे सांभाळते. नेहमीच आपल्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीला स्पेशल जाणीव करून देण्यासाठी ती सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. अशीच एक पोस्ट तिने एका खास व्यक्तीसाठी शेअर केली आहे आणि नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चला तर जाणून घेऊयात कोण आहे हि खास व्यक्ती.
अभिनेत्री श्रेया बुगडेने शेअर केलेली हि पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हि पोस्ट तिने ज्या खास व्यक्तीसाठी शेअर केली आहे ती व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून अभिनेता पियुष रानडे आहे. श्रेया पियुषला भाऊ मानते आणि म्हणूनच त्याच्या वाढदिवसानिमित्त तिने हि पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट शेअर करताना श्रेयाने पियूषच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
सोबतच अतिशय सुंदर आणि भावनिक कॅप्शन तिने शेअर केले आहे. तिने लिहिलंय कि, ‘तू नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ आहेस आणि माझ्या जीवनाला तुझ्याशिवाय अर्थ नाही. जर प्रत्येक बहिणीकडे तुझ्यासारखा भाऊ असेल तर जग आणखी चांगलं होईल. मोठ्या भावासोबत आयुष्य नेहमीच भारी असतं. तुझा वाढदिवस तुझ्यासोबत सेलिब्रेट केल्याचा खूप आनंद झाला दादु’.
त्याच काय आहे, श्रेयाला सख्खी मोठी बहीण आहे पण सख्खा भाऊ नाही. पण पियुष तिच्यासाठी सख्ख्या भावापेक्षासुद्धा जास्त जवळचा आहे. काही वर्षांपूर्वी ‘एकाच जन्मी जणू’ या मालिकेत श्रेया आणि पियुष एकत्र काम करत होतो. या मालिकेत ते बहीण- भावाच्या भूमिकेत होते. हे मालिकेतलं खोटं नातं आज खऱ्या आयुष्यात अधिकच घट्ट आणि खरं झालं आहे. या मालिकेत श्रेया पियुषला ‘दादू’ अशी हाक मारायची आणि आजही ती त्याला दादू अशीच हाक मारते. एका मुलाखतीत श्रेयाने म्हटले होते कि, ‘शूटिंगच्या काळात अनेकांना नवे मित्र मिळतात.. पण मला मात्र भाऊ मिळाला’. श्रेयाच्या पोस्टवर तिच्या दादूला चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
Discussion about this post