हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने गेल्या महिन्यात तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत आपण प्रेग्नेंट असल्याचे चाहत्यांना सांगितले. बातमी आनंदाची पण चाहत्यांना मात्र धक्काच लागला. कारण इलियाना अद्याप अविवाहित आहे. मात्र तरीही लवकरच ती एका बाळाची आई होणार आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर या बाळाचे बाबा कोण असतील..? याबाबत चर्चा रंगली. दरम्यान इलियाना मात्र या चर्चांपासून लांब आहे आणि तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. नुकतेच सोशल मीडियावर तिने बेबी बंप दाखवतानाच व्हिडीओ शेअर केला आहेत.
अभिनेत्री इलियाना डिक्रुझने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या प्रेग्नेंसी प्रवासाची एक झलक शेअर केली आहे. इलियानाने पहिल्यांदाच चाहत्यांसोबत बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी इलियाना लग्नाआधीच आई होत आहे. त्यामुळे या गरोदरपणाकडे तिचा पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. तिने अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या पाळीव मांजरीसोबत बेडवर आराम करत कॉफी पिताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने बेबी बंपची झलक दाखवली आहे.
इलियानाने आपल्या गोड बातमीबाबत सोशल मीडियावरचं माहिती दिली होती. ‘लवकरच येत आहे… माझ्या प्रिय, तुला भेटण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही’ असे कॅप्शन देत सोबत लहान बाळाच्या शर्टचा फोटो शेअर करत तिने हि माहिती चाहत्यांना दिली होती. तिच्या या पोस्टवर जितका शुभेच्छांचा वर्षाव होत होता, तितकाच प्रश्नांचादेखील होत होता. लग्न तर झालं नाही मग प्रेग्नेंट कशी..? या बाळाचे वडील कोण आहेत..? असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारण्यात आले. काही दिवसांपूर्वी, इलियाना अभिनेत्री कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होत. त्यामुळे बाळाचे वडील सेबॅस्टियन असू शकतो असा अंदाज नेटकरी लावत आहेत.
Discussion about this post