हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोघे अनेक ठिकाणी स्पॉट झाल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू असल्याचे समजले. याबाबत दोघांनीही अद्याप अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही त्यांना एकत्र पाहताच चाहते मात्र एक्साइट होताना दिसत आहेत.
नुकतेच मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएल मॅचचा सामना पाहण्यासाठी राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा मोहालीत पोहोचले होते. दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये राघव आणि परिणीती एकत्र दिसत आहेत आणि त्यांना पाहून स्टेडियममधील प्रेक्षक फारच आनंदी झाल्याचे दिसत आहे. यावेळी काही प्रेक्षकांनी ‘परिणिती भाभी जिंदाबाद’ अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या. या घोषणा ऐकताच राघव चड्डा आणि परिणीती चोप्राच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल काही औरच होती.
‘परिणिती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा देताना हे प्रेक्षक परिणीती आणि राघवकडे पाहत होते आणि मोठमोठ्याने घोषणा देतच होते. यावेळी परिणीतीला तिचे हसू आणि गालावर चढलेली लाली लपवता आली नाही. तर राघव चड्डादेखील या घोषणा ऐकून हसताना दिसले. इतकंच काय तर परिणीतीने तर तिच्या डोक्यावरच हात मारला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतोय. यावर एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, ‘येह पब्लिक है सब जानती है।’ मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव यांचा १३ मे २०२३ रोजी साखरपुडा होणार होता. मात्र काही दिवसांपूर्वी ईडीच्या पुरवणी आरोप पत्रात राघव यांचे नाव आल्याने हा साखरपुडा इतक्यात होणार नसल्याचे बोलले जात आहे.
Discussion about this post