हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे महाप्रयोग सध्या महाराष्ट्रभर सुरु आहेत. राज्यभरात हे महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या महानाट्याचे महाराष्ट्र दौरा सुरु असताना औरंगाबाद, कोल्हापूरनंतर हा दौरा कराडमध्ये आला होता. यावेळी प्रयोग रंगला मात्र अमोल कोल्हे यांचा अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. याच प्रयोगादरम्यान एक असा प्रसंग घडला जो पाहून सगळेच थक्क झाले.
कराडमधील एका प्रयोगादरम्यान कोल्हे मंचावर प्रवेश घेताना घोड्याचा पाय दुमडला आणि त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. पण त्यांनी शो रद्द न करता प्रयोग पूर्ण केला. ज्याचे सर्वत्र कौतुक झाले. याच प्रयोगादरम्यान कोल्हेनी एका चिमुकल्याचा पाय धरल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, अमोल कोल्हे प्रेक्षकांची भेट घेत असताना एक लागण मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात त्यांच्या सामोर आला. त्याला बघता क्षणी अमोल कोल्हे त्याच्या पाया पडले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
यावेळी तो चिमुकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात ओटा आणि म्हणूनच त्याक्षणी त्याला महाराजांइतकच महत्व आणि सन्मान देणे आवश्यक होते. जे अमोल कोल्हेनी केले. महाराजांच्या रूपात येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या ते पाया पडताना दिसले. त्यांना वाकून मुजरा करताना दिसले. दरम्यान एखादा चिमुकला जर अमोल कोल्हेंच्या पाया पडू लागला तर ते त्याला अडवत म्हणाले, ‘तुम्ही पाया पडायचं नाही.. पाया मी तुमच्या पडणार..’ या प्रयोगादरम्यान झालेल्या अपघातात दुखापत झालेले अमोल कोल्हे आता सक्तीच्या विश्रांतीवर असून पुन्हा ११ ते १६ मे दरम्यान महानाट्याच्या प्रयोगासाठी सज्ज होत आहेत.
Discussion about this post