हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेइंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता आमिर खान हा त्याच्या चित्रपटांसह खाजगी आयुष्यामुळे सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याच्या लेकीचा बॉयफ्रेंड आणि तिची एंगेजमेंट याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. शिवाय आमिर खान आणि किरण यांचा घटस्फोट देखील चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर आता दोन लग्न मोडल्यावर आमिर तिसऱ्या लग्नाचा विचार करत असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे. अभिनेता आमिर खान आणि बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेख यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबत गॉसिपिंग सुरू आहे.
योगेन शाह यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री फातिमा सना शेख हे पिकबॉल खेळताना दिसत आहेत. या आधीही आमिर आणि फातिमा यांच्या रिलेशनबद्दल बऱ्याचदा चर्चा रंगली होती. अशातच आता पुन्हा एकदा त्या दोघांना एकत्र पाहिल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपबाबत पुढच्या चर्चा रंगल्या आहेत. जसे की आमिर खान आता तिसऱ्यांदा लग्न करणार असून तिसरी बायको आणणार आहे, असे काही नेटकरी म्हणत आहेत. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आमिर खानला ट्रोल केलं आहे.
आमिर आणि फातिमा यांच्या या व्हायरल व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटलंय, ‘ही तर तिसऱ्या मम्मीची तयारी’. तर आणखी एका युजरने लिहिले, ‘आमिर आता तिसरी बायको आणणार वाटतं’. तसेच आणखी एकाने म्हटले, ‘थोड्याच दिवसात आमिर- फतिमा ऑफिशियल लग्न करतील’. इतकेच काय तर एका युजरने आमिरला सुनावताना म्हटले आहे, ‘ती तुझ्या मुलीच्या वयाची आहे तिला तरी सोड रे बाबा’. याशिवाय आणखी एका युजरने आमिर खानच्या चारित्र्यावर प्रश्न उठवत म्हटले आहे कि, ‘सगळ्यात वाईट माणूस आहे हा.. आपल्या फायद्यासाठी मुलींचा वापर करतोय .. विश्वास घातकी आणि धर्माची कुचेष्टा करणारा राक्षस आहे हा!!”
Discussion about this post