हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हि नेहमीच तिच्या परखड बोलण्यामुळे चर्चेत राहिली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ती तिच्या रिलेशनशिप आणि लग्नामुळे चर्चेत आली होती. स्वरा भास्करने फेब्रुवारी २०२३ मध्ये समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले आणि आता तिच्या प्रेग्नन्सीची बातमी देत तिने चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे. स्वराने पती फहाद अहमदसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत हि गुड न्यूज दिली आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने ती आई होण्याचा आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर करताना एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पती फहादसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. हे गोड फोटो शेअर करताना स्वराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘कधी कधी तुमची प्रत्येक प्रार्थना एकत्र ऐकली जाते. या संपूर्ण नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी कृतज्ञ आणि उत्साही वाटत आहे. कमिंग सून… कुटुंब… ऑक्टोबर बेबी…’. स्वराने लिहिलेल्या कॅप्शनवरून समजते आहे कि, स्वरा अन फहाद यांच्या बाळाचा जन्म ऑक्टोबरमध्ये होणार आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी सर्वात आधी ६ जानेवारी २०२३ रोजी कोर्ट मॅरिज केले. यांनतर स्वराला खूप ट्रोल केले गेले. मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत ती तिच्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात एन्जॉय करत होती. यानंतर तिने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत फहादसोबतच्या लग्न विधी एन्जॉय केल्या. त्यांच्या मॅरिज इव्हेन्टचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
Discussion about this post