हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं वय वाढत असलं तरीही तिचं सौंदर्य आजही तितकंच कातिलाना आहे. एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस गुरु अशी शिल्पा शेट्टीची स्वतःची खास ओळख आहे. आज दिनांक ८ जून आणि आज शिल्पा शेट्टीचा ४८ वा वाढदिवस आहे. तिच्याकडे बघून वाटत नसलं तरीही सत्य बदलणार नाही. वयाची पन्नाशी जवळ आली पण शिल्पा शेट्टी आजही तितकीच कुल, हॉट आणि बोल्ड आहे. शिल्पा तिचा यंदाचा हा खास बर्थडे मुंबईऐवजी लंडनमध्ये सेलिब्रेट करते आहे. याच एक खास कारण आहे ते आपण जाणून घेऊया.
फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी योगा, कार्डिओ, पिलाटेस आणि अश्या अनेक गोष्टी करताना दिसते. स्वतःसोबत इतरांना देखील ती फिट राहण्याचा आणि निरोगी सवयी लावून घेण्याची प्रेरणा देत असते. शरीरासोबत मानसिक निरोगी राहण्यासाठी अन सकारात्मक विचारांना आत्मसाद करण्यासाठीदेखील शिल्पा सर्वाना प्रोत्साहित करत असते. मधल्या काळात शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात उलथा पालथ झाल्याचे आपण पाहिले.
पती राज कुंद्राचं पॉर्नोग्राफीचं प्रकरण शिल्पा शेट्टीला फार जड गेलं. मानसिक त्रास, मनस्ताप, ताण- तणाव अशा अत्यंत वाईट परिस्थितीतून शिल्पा शेट्टी आज सावरली आहे. म्हणून या भावनांच्या कल्लोळातून विश्रांती घेत तणाव दूर करण्यासाठी म्हणून शिल्पा शेट्टी यंदा तिचा वाढदिवस घरापासून लांब लंडनमध्ये मात्र संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करत आहे.
या खास बर्थडे सेलिब्रेशनविषयी एका वृत्त वहिनीला सांगताना शिल्पा शेट्टीने म्हटले कि, ‘गेले काही दिवस मी माझ्या कामामध्ये प्रचंड बिझी होते. गेलं वर्ष हे मला खूपचं दमवणारं होतं. ‘सुखी’, ‘इंडियन पोलिस फोर्स’ आणि ‘केडी’ या सिरीज अन सिनेमांमूळे मी कामात खूप अडकले होते. त्यात काही ब्रँडचेही शूट होते. त्यामुळे मला स्वतःला वेळ हवा होता. लंडन हे माझे दुसरे घर आहे. इथे मी निवांत आहे. मुलांसोबत फिरते, बागेत जाते, इथल्या पार्कामध्ये जाऊन फिरते. शिवाय राज मुलांकडे लक्ष देतो. त्यामुळे मला खूप आराम मिळतोय’.
Discussion about this post