हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । गेल्या आठवड्यात कोरोना व्हायरसला पॉझिटिव्ह आल्यानंतर बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची त्वरित टेस्ट घेण्यात आली आहे. आरोग्य पथकाने १६२ लोकांची यादी तयार केली होती, त्यापैकी ६३ लोकांची तपासणी निगेटिव्ह आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कनिका कपूरशी या समारंभात संपर्कात आलेल्या ६३ लोकांना कोरोना व्हायरस झालेला नाही.परंतु उर्वरित लोकांचे अहवाल अजून आले नाहीत. त्याचवेळी, आरोग्य अधिकारी मुंबईतील एका व्यावसायिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत,ज्याने सांगितले की सिंगरला ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथेच ती त्याला भेटली होती.
कनिका ९ मार्च रोजी लंडनहून भारतात परतली. यानंतर तिने ११ ते १६ मार्च या कालावधीत अनेक सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावली. आपण कोरोना विषाणूमुळे पीडित असल्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. यानंतर कनिकावर लोकांना खूप राग आला. तथापि, विमानतळावर तिची टेस्ट घेण्यात आली, असे तिने आपल्या बचावामध्ये म्हंटले,पण तो निगेटिव्ह झाला.
अलीकडेच, कोरोनाव्हायरस-संक्रमित गायिका कनिका कपूरला लंडनहून परत आल्यानंतर आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु तिने दुर्लक्ष करत लखनऊमध्ये आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह पार्टी केली.तिच्या या बेजबाबदार वागणुकीबद्दल नेटिझन्सनी तिच्यावर जोरदार टीका केली. जरी विमानतळावर तिची चाचणी घेण्यात आली असे सांगत तिने स्वत: चा बचाव केला, परंतु तो निगेटिव्ह आला.अगदी बाथरूममध्ये लपणे ही बाब केवळ एक अफवा आहे.