हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । नैराश्याच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 18 वर्षाच्या मुलीने नैराश्यामुळे आत्महत्या केली आहे. ही मुलगी टिकटॉकची मोठी स्टार होती आणि या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर तिचे बरेच फॉलोअर्स देखील होते. पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नसली तरी नुकतेच टिकटॉक घातलेल्या बंदीनंतर ही मुलगी खूपच अस्वस्थ झाल्याचे समजते आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या मुलीचा मृतदेह तिच्या चुलतभावाने पहिल्यांदा पाहिला आणि त्यानंतर त्यानेच पहिले अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्याचवेळी कुटुंबातील काही जवळच्या सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, ही मुलगी गेल्या काही 2-3 महिन्यांपासून नैराश्याने ग्रासलेली होती आणि म्हणूनच कदाचित तिने हे पाऊल उचलले.
काही दिवसांपूर्वीच सिया कक्कड एका टीक-टॉक स्टारने आत्महत्या केली होती. भारत आणि चीनमधील वाढत्या तणावानंतर अलीकडेच देशात 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात टिक-टॉकचा देखील समावेश आहे.
गेल्या काही काळामध्ये टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांमध्ये सतत नैराश्य आणि आत्महत्येच्या बातम्या समोर येत आहे. टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने घरात आत्महत्या केली असून, क्राइम पेट्रोलमध्ये दिसणारी प्रेक्षा मेहतानेही इंदूरमधील आपल्या घरात स्वत: ला गळफास घेऊन आत्महत्या केली. यासह हिंदी चित्रपटांतील मोठे नाव असलेला सुशांतसिंग राजपूत यानेही 14 जूनला स्वत: च्या घरात लटकवले. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत हा गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्यावर उपचार घेत होता.