हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चाहते आणि अभिनेते शेखर सुमन तर सतत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत, नुकतेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
त्यानंतर, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनीही ट्विटर आणि इंस्टावर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने गृहमंत्री अमित शहा यांना याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली आहे. मात्र,रिया ला या पोस्टनंतर बरीच ट्रोल केले गेले होते. या प्रकरणी आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवेदन समोर आले आहे.
अनिल देशमुख म्हणाले, ‘यामध्ये सीबीआय चौकशीची गरज नाही, मुंबई पोलिस तपास करत आहेत आणि मुंबई पोलिस अशी प्रकरणे हाताळण्यासाठी पुरेसे आहेत’. अनिल देशमुख म्हणाले, मीसुद्धा सुशांतशी संबंधित ट्वीट आणि कॅम्पन्स पाहिले आहेत. परंतु मला असे वाटते की हे प्रकरण हाताळण्यासाठी सीबीआयची आवश्यकता नाही. मुंबई पोलिस अशी प्रकरणे हाताळण्यास सक्षम आहेत. ते या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाबींचा शोध घेत आहेत आणि आतापर्यंत आम्हाला त्यात कोणतीही कमतरता दिसत नाही. लवकरच तपासाचा संपूर्ण अहवाल समोर येईल.