Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

“भट्ट परिवाराने माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; ‘या’अभिनेत्याचा खळबळजनक आरोप

tdadmin by tdadmin
July 28, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहे. अनेक कलाकारांनी स्वत:हून पुढे येत या गटबाजीच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यातच आता अभिनेता रणवीर शौरी याने देखील मनातील खदखद व्यक्त करत निर्माता महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. भट्ट कुटुंबीयांनी माझं करिअर संपवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोप त्याने केला आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने बॉलिवूड सिनेसृष्टीतील गटबाजीवर भाष्य केलं. यावेळी स्वत:चे काही अनुभव सांगताना त्याने भट्ट कुटुंबावर टीका केली. “बॉलिवूड सिनेउद्योग हा घराणेशाही, गटबाजी आणि मक्तेदारीमुळे पोखरला आहे. जर त्यांच्या मनासारखं काही झालं नाही तर नव्या कलाकारांना ही मंडळी संपवून टाकतात. हा अनुभव मी देखील घेतला आहे. २००३ ते २००५ या दोन वर्षात मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. भट्ट कुटुंबीयांनी माझ्या विरोधात अनेक अफवा पसरवल्या होत्या. मी मद्यपी आहे, उद्धट आहे, दिग्दर्शकांना शिव्या घालतो अशा अनेक खोट्या बातम्या त्यांनी पसरवल्या. ही मंडळी इतकी बलाढ्य आहेत की त्यांच्या विरोधात मी काहीही करु शकत नव्हतो, अन् या गोष्टीचा त्रास मला जास्त होत होता. त्यावेळी मी देश सोडून जाण्याचाही विचार करत होतो. पण कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या मदतीने मी स्वत:ला सावरलं. परिणामी आजही मी या क्षेत्रात काम करत आहे.” असे  रणवीर शौरीने सांगितल. यापूर्वी देखील त्याने असंच काहीसं ट्विट करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती.

रणवीर शौरी बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता आहे. २००२ मध्ये ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘खोसला का घोसला’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’, ‘भेजा फ्राय’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिथ्या’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Tags: BollywoodMahesh Bhatt
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group